पिंपळगाव : दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा जगातील ही सर्वांत जुनी व मोठी मॅरेथॉन स्पर्धा आहे. जगातील अगदी मोजके धावपटू या कॉम्रेड स्पर्धेसाठी पात्र ठरतात. या स्पर्धेत या वर्षी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातून हौशी धावपटू सहभागी होण्यासाठी कसून सराव करीत आहेत. (Runners training for Comrades Marathon in Africa)
या मॅरेथॉन स्पर्धेचा सराव म्हणून ‘स्ट्रेकिंग स्ट्रायडर्स’ या ग्रुपच्या धावपटूंची तयारी सध्या सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक रनर्स व नाशिकच्या ‘स्ट्रेकिंग स्ट्रायडर्स’ या ग्रुपतर्फे सप्तशृंगगड येथे सराव रनचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांतूनही या सराव रनसाठी सहभागी झालेल्या धावपटूंनी शनिवारी (ता. ११) सप्तश्रृंगीमातेचे दर्शन घेत गडावरील गारव्याच्या आल्हाददायक वातावरणात रात्री अकराला सराव रनला सुरवात केली. यात सप्तशृंगगड ते कळवण व पुन्हा कळवण ते सप्तशृंगगड असा मार्ग निश्चितच करण्यात आला होता.
सराव रनसाठी बुलडाणा, नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक येथून धावपटू सहभागी झाले होते. जवळपास ९० ते १०० धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. एकूण ६० किलोमीटरचे अंतर निर्धारित करण्यात आले होते. रनच्या मार्गावर धावपटूंसाठी आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करून वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली होती. (latest marathi news)
सराव रनसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांचे योगदान लाभले. सराव रन यशस्वितेसाठी ‘स्ट्रेकिंग स्ट्रायडर्स’ व नाशिक रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी प्रयत्न केले.
जगातील अवघड स्पर्धा
जगातील अत्यंत अवघड समजली जाणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असल्यामुळे धावपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी ही मॅरेथॉन आहे. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी धावपटू कसून सराव करताना दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.