Gram Panchayat esakal
नाशिक

Nashik Gram Panchayat : आम्हाला कुणी घर देता का घर? जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींची स्थिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Gram Panchayat : ग्रामीण भागात गावाचा कारभार हाकणाऱ्या जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीला स्वतःच्या इमारती नाहीत. भाड्याच्या खोलीत, शाळा परिसर, खासगी जागेत ग्रामपंचायतींचा कारभार सुरू आहे. यातही काहींची पडझड झाली आहे, तर काहींना दुरुस्तीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील एक हजार ३८८ ग्रामपंचायतींपैकी एक हजार ३५६ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती आहे. मात्र, ३२ ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची गरज आहे. (rural areas of district 32 Gram Panchayats without own building )

राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा, तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली असून, आता ही योजना २०२७-२८ या वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने या ग्रामपंचायतींच्या इमारतीचे प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यात अनेक लहान गावांत आणि गटग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खासगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी, याकरिता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला २०१८ मध्ये सुरवात केली.

या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि एक हजार ते दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाखांचा निधी दिला जात होता. या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून, दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीला स्वनिधीतून उभारावी, अशी अट होती. (latest marathi news)

तसेच दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येत होती. गत दोन वर्षांपासून या योजनेंतर्गत इमारतींसाठी निधीचे प्रस्ताव शासनाकडे पडून होते. मात्र, राज्य शासनाने आता ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा, तसेच योजनेला मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १५ लाखऐवजी २० लाख रुपये आणि ददोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाखऐवजी २५ लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच यापूर्वी ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अटदेखील रद्द केली आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता ज्या ग्रामपंचायतींना इमारती नाही त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले असता, यात सहा तालुक्यांतील ३२ ग्रामपंचायतींना अद्यापही स्वतःच्या इमारती नाही. त्यामुळे या योजनेतून या इमारतींना निधी मिळणार आहे. त्यासाठी असलेले प्रस्ताव पाठविले जाणार आहे.

...या गावांना हवी इमारत

सिन्नर : औढेवाडी, डुबेरे, रोहिले बु., टाकळी बु.

नांदगाव : भार्डी, माळेगाव, मोहगाव, शास्त्रीनगर, पळाशी, हिसवळ बु.

येवला : लौकी शिरस

निफाड : रौळस, कोकणगाव

मालेगाव : मोहपाडा, गिंगाव, माल्हणगाव, शेंदुर्णी, अंदजे, दहिदी, टोकडे

बागलाण : साळवण, भिलदर, जाखोडे, कातरवेल, तताप्पी, मोराणे-सांडस, बिजोटे, ब्राह्मणपाडे, खिरमाणी, कोळीपाडा, आखतवाडे, भाक्षी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT