Malegaon Nashik Rural Police team raided illegal hand kiln, liquor dens. esakal
नाशिक

Nashik Crime News : अवैध हातभट्टी, मद्याचे अड्डे रडारवर! नाशिक ग्रामीण पोलिसांकडून छाप्यानंतर 6 गुन्‍हे दाखल

Nashik News : अवैध हातभट्टी व मद्यनिर्मिती अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गुरुवारी (ता. २७) नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अवैध हातभट्टी व मद्यनिर्मिती अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गुरुवारी (ता. २७) नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केली. मालेगाव तालुक्‍यात व जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभ‌ट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणाऱ्या सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ७० लिटर गावठी मद्य. (Rural Police conducted raids to destroy illegal hand kiln and breweries)

एक हजार ३६० लिटर रसायन, असा एकूण ७८ हजार रुपयांचे गावठी मद्य, रसायन व इतर साहित्‍य जप्त केले असून, संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्‍हे दाखल केले आहेत. ग्रामीण पोलिसांच्‍या या धाडसत्रात मालेगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीतील सौंदाणे शिवार, दहिवाळ शिवार, येसगाव शिवार व जळकू शिवारातील अशा चार ठिकाणी आणि जायखेडा पोलिस ठाणे हद्दीत ताहाराबाद शिवारातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध मद्य गाळप करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील डोंगर-दर्या, नदी-नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी मद्य हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर. (latest marathi news)

अनिकेत भारती यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्‍या पथकातील उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार गोरक्षनाथ संवत्सरकर, पोलिस नाईक शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, दत्तात्रय माळी, मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ यांच्‍या पथकाने कामगिरी केली आहे.

"अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी माहिती द्यावी. अशी माहिती देणाऱ्या व्‍यक्‍तींचे नाव गुप्त ठेवले जाईल. हातभ‌ट्टीचे गावठी मद्य तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळले आहे. अशा प्रकारचे गावठी मद्य हातभ‌ट्टीचे अड्डे सुरू असल्यास पोलिसांना तत्काळ संपर्क करावा." - विक्रम देशमाने, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT