Jal Jeevan Mission esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 626 योजनांतून पाणीपुरवठा सुरू! जिल्ह्यात जूनअखेर 930 योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांपैकी सुमारे ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. यातील ६२६ पाणीपुरवठा योजनांतून प्रत्यक्ष नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला. (rural water supply department of Zilla Parishad started water supply through 626 schemes of Jal Jeevan)

मेअखेर आणखी ५० योजना पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे टॅंकर कमी होणार असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाईबाबत आढावा बैठक कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी आयोजित केली होती.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते, शाखा अभियंते, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स संस्था प्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एक हजार ४१० कोटींच्या एक हजार २२२ योजनांची कामे सुरू आहेत. या सर्व योजना पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. मात्र, सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

१५ एप्रिलपर्यंत ६१७ योजनांची कामे पूर्ण केली होती व आता १८ मेपर्यंत ६८१ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण केल्याचे या वेळी सांगण्यात आले. या पूर्ण झालेल्या ६२६ योजनांतून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. काही योजनांची १० ते २० टक्के कामे शिल्लक आहेत. ही कामे मेअखेर पूर्ण होतील. त्यामुळे जिल्ह्यातील टॅंकरची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी सांगितले. (latest marathi news)

तपासणीसाठी नियुक्त टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स संस्थेच्या प्रतिनिधींकडून या वेळी आढावा घेण्यात आला. ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण आहेत. १८ मेपर्यंत या तपासणी संस्थेने ३० लाखांवरील रकमेच्या १४७ पाणीपुरवठा योजनांची तपासणी केली असून, ३० लाखांच्या आतील ३० योजनांची दोन टप्प्यांत तपासणी केली आहे.

यामुळे त्रयस्थ संस्थेच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या एक हजार २२२ योजनांपैकी केवळ १७७ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण असल्याचे दिसत आहे. यासाठी त्रयस्थ संस्था प्रतिनिधींनी पाणीपुरवठा योजनांची तपासणी करावी, अशा सूचना सोनवणे यांनी बैठकीत दिल्या.

९३० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

सद्यस्थितीत ६८१ योजना पूर्ण झालेल्या आहेत. मेअखेर ७०० हून अधिक योजनांचे काम पूर्ण झालेले दिसेल. ३० जूनपर्यंत एकूण ९३० योजनांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार उपअभियंते, शाखा अभियंते यांना आदेश दिले आहेत. त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा योजनांची पाहणी करणार असल्याचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT