Nashik NMC Transfers : शिपाई संवर्गातील १६ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. असे असतानाच आता महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागातील उपअभियंता संवर्गातील अभियंत्यांच्या बदल्यांचे वारे सुरू झाल्याने मोठे नाराजी पसरली आहे. विशिष्ट टेबलवर बदली करण्यासाठी इच्छुक तसेच सध्या अशा टेबलांवर काम करणाऱ्या अभियंत्यांना निरोप पोचल्याने महापालिका प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (rush of transfers in municipal corporation)
पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जवळपास शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात कुठल्या पक्षाचे सरकार राहील याची शाश्वती नाही, असा अंदाज बांधून काही पदाधिकाऱ्यांनी थेट दुसऱ्या फळीतील अभियंता संवर्गातील बदल्यांसाठी प्रयत्न करून महापालिका निवडणुकीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.
नगररचना व बांधकाम विभागातील उपअभियंत्यांना थेट बदल्यांचे निरोप केल्याने महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंचवटी विभागात बांधकाम विभागात उपअभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे नगररचना विभागातदेखील येत्या काळात बदल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर अद्याप कुठल्याही बदल्या झालेल्या नाही व बदल्यांचे तसे नियोजनदेखील नसल्याचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.