SAKAL Chat : शुक्रवारी तपोवनात उद्घाटन झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीने नाशिकच्या वैभवात मोलाची भर पडली. धर्नुधारी श्रीरामाची पूर्णाकृती मूर्ती साकारताना छत्रपती संभाजीनगर शहरातील मूर्तिकार गौरव तापके यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : शिल्प साकारण्यासाठी किती कालावधी लागला?
गौरव : फेब्रुवारी २०२४ मध्ये कामाची ऑर्डर मिळाली. त्यानंतर श्रीरामांच्या मूर्तीचे छोटे मॉडेल तयार केले. नाशिकची टीम मॉडेल बघण्यासाठी आल्यानंतर त्यांनी होकार दिला. मूर्तीची परवानगी मुंबईतील कला संचनालयाकडून घेण्यात आली. मार्च महिन्यात मूर्ती तयार करायला सुरवात झाली. संपूर्ण मॉडेल सीएनसी मशिनवर बनविण्यात आले. मूर्ती घडविण्यासाठी ३.२० कोटी इतका खर्च झाला आहे.
( Positive energy received while creating sculpture of Lord Sri Ram)
प्रश्न : नाशिकमध्ये श्रीरामाचे शिल्प साकारण्याचा अनुभव कसा होता?
गौरव : मूर्तीचे ८० टक्के काम छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण केले होते. उरलेले २० टक्के काम जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून काम करायला सुरवात केली. स्थानिक लोकांनी खूप सहकार्य केले. काम करताना पावसाची भीती होती, पण ताडपत्री लावून दोन-तीन शिफ्टमध्ये सलग काम केले. त्या कामातून दररोज नवीन ऊर्जा मिळत होती. (latest marathi news)
प्रश्न : मूर्तीसाठी कोणत्या प्रकारचे मटेरिअल वापरण्यात आले आहे?
गौरव : पायापासून मूर्तीची उंची ५५ फूट आहे, तर वजन १० टनापेक्षा अधिक आहे. मूर्तीसाठी एफआरपी अर्थात फायबर रेनफोर्स पॉलिमर मटेरिअल वापरण्यात आले आहे. जेणेकरून कितीही पाऊस, वादळ, वारा असला तरी मूर्तीला कोणतीही इजा होत नाही. रामाच्या मूर्तीच्या पायात २० एमएम फायबर कॉलम, बीम टाकण्यात आले आहे. दीड मीटर कॉलमवर टाय बीम टाकले आहेत. त्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात आले असून, मूर्तीला ब्रॉन्झ रंग देण्यात आला आहे.
प्रश्न : नाशिकमधील काम वेगळे कसे ठरले?
गौरव : आजवर राज्यात आणि राज्याबाहेर अर्धाकृती ३५-४१ फुटांचे अनेक पुतळे साकारले आहेत. पण नाशिकमधील प्रभू श्रीरामांची पूर्णाकृती शिल्प करणे मोठा प्रोजेक्ट होता, जो कमी कालावधीत करणे शक्य नव्हते. प्रभू श्रीरामाच्या कृपेने शक्य झाले. आमच्या पाच पिढ्या मूर्ती कलेच्या व्यवसायात आहेत. आतेभाऊ निरंजन मडिलगेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. आजही हा पिढीजात व्यवसाय सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.