competitive exam students esakal
नाशिक

SAKAL Follow Up: बस झालं... आता परीक्षार्थ्यांच्‍या अडचणी सुटाव्‍यात! वाचा फोडल्‍याबद्दल ‘सकाळ’चे कौतुक

Nashik News : घरापासून लांब इतर शहरांतील केंद्र गाठत परीक्षेला सामोरे जाणाऱ्या परीक्षार्थ्यांचा होणारा मनस्‍ताप ‘सकाळ रिॲलिटी चेक’ माध्यमातून मांडण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरापासून लांब इतर शहरांतील केंद्र गाठत परीक्षेला सामोरे जाणाऱ्या परीक्षार्थ्यांचा होणारा मनस्‍ताप ‘सकाळ रिॲलिटी चेक’ माध्यमातून मांडण्यात आला. ‘केविलवाण्या चेहऱ्याची दखल व्‍यवस्‍था घेईल का’, असा प्रश्‍न विचारणाऱ्या वृत्तातून या गंभीर प्रश्‍नाची वाटा फोडल्‍याबद्दल विविध स्तरांवरून ‘सकाळ’चे कौतुक करण्यात आले.

परीक्षा आयोजन संस्‍था, परीक्षा केंद्रातील व्‍यवस्‍थापन, व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अशा वेगवेगळ्या आस्‍थापना, नागरिक यांच्‍या सामुहिक प्रयत्‍नांतून या अडचणींना पूर्णविराम लावावा, अशी अपेक्षा यानिमित्त व्‍यक्‍त केली आहे. (nashik SAKAL Follow Up solve problems of examinees marathi news)

‘सकाळ’ च्या वृत्ताचे स्वागत शिक्षणक्षेत्रातील संवेदनशील मान्‍यवरांनी केले. राज्यभरातून विविध परीक्षांच्या निमित्ताने आलेल्या मुलांची होणाऱ्या दैनावस्थेकडे लक्ष वेधले होते. वस्तुतः ही परिस्थिती राज्यभरातील बहुतेक शहरांमध्ये दिसून येत आहे. या विषयाला वाचा फोडल्यानंतर आता परीक्षेसाठी विविध ठिकाणांहून शहरांमध्ये दाखल होणाऱ्या या हजारो मुलांसाठी काय-काय करता येऊ शकते, याची चर्चा सुरु झाली आहे.

प्रथमदर्शनी ज्या केंद्रांमध्ये ही मुले-मुली परीक्षांसाठी येतात, त्या केंद्रांनी किमान सोयी उपलब्ध करून द्यायला काय हरकत आहे, यावर विचारमंथन होऊन कृती होणे गरजेचे आहे. या केंद्रांना परीक्षा आयोजनाच्‍या मोबदल्‍यात भाडे मिळत असते. त्‍यामुळे त्‍यांनी किमान पायाभूत सुविधा उपलब्‍ध करणे क्रमप्राप्त असल्‍याच्‍या प्रतिक्रिया उमटल्या. उपाययोजनांसाठी संस्थांनी आणि संबंधितांनी पुढे येण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे.

चर्चेतून समोर आलेल्‍या बाबी अशा...

* आयोजन संस्‍थांनी शक्‍यतो लांबच्‍या शहरांतील केंद्रांचा पर्याय देऊ नये.

* परीक्षा शुल्‍क थोडे वाढविले तरी चालेल, पण विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या शहरात किंवा नजीकच्‍या ठिकाणी परीक्षा देण्याची सुविधा करावी.

* परीक्षा केंद्र व्‍यवस्‍थापनाने परीक्षार्थींसोबत सौजन्‍याने वागावे

* झेरॉक्‍स सुविधा, बॅगांसह साहित्‍य ठेवण्याची सुविधा द्यावी.

* सुरक्षारक्षकाची नियुक्‍ती करताना परीक्षार्थींच्‍य साहित्‍याचे संरक्षण करावे.

* आलेल्‍या परीक्षार्थ्यांना प्रसाधनगृहांचा वापर सुलभरीत्या करता येईल, अशी व्‍यवस्‍था करावी.

* सतत परीक्षा होत असलेल्‍या केंद्र परिसरात महापालिकेतर्फे फिरते प्रसाधनगृह उभे केलेले फायद्याचे ठरेल.

* परीक्षार्थींसोबत आलेल्‍या पालकांसाठी विश्रांतीसाठी वर्गखोली किंवा मोकळी जागा असावी.

* परीक्षार्थींनादेखील प्रतीक्षा करण्यासाठी आवाराचा वापर करू द्यावा.

"‘सकाळ’ने अतिशय महत्त्वाच्‍या विषयाला वाचा फोडली असून, परीक्षार्थ्यांचे प्रश्‍न तातडीने सुटले पाहिजे. बऱ्याचदा परीक्षा केंद्रांवर पायाभूत सुविधांचा वाणवा जाणवतो. किमान निकषांचे पालनदेखील केले जात नाही. आता चर्चा सुरू झाली आहे, तर प्रत्‍येक घटकाने प्रशासन, निर्णयकर्त्यांकडे आग्रह धरत ही समस्‍या सोडवावी. ‘एमपीएससी’कडे आयोजनाची जबाबदारी दिल्‍यास परीक्षा शिस्‍तबद्धपणे पार पडतील."

- राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समिती

"बऱ्याचदा परीक्षार्थी आपले गाऱ्हाणे घेऊन भेटायला येतात. त्‍यांच्‍या अपेक्षा रास्‍त असतात. परीक्षा केंद्राभोवती किमान परीक्षार्थ्यांना सुविधा उपलब्‍ध होणे महत्त्वाचे आहे. सध्याची रोढावलेल्‍या प्रक्रियेत बदल करण्याची आवश्‍यकता असून, ‘सकाळ’ने या प्रश्‍नाकडे लक्ष वेधताना परिवर्तनाला सुरवात केली आहे. बातमीची दखल घेताना परीक्षा आयोजन संस्‍था आणि परीक्षा केंद्र असलेल्‍या संस्‍था यांच्‍यात यापुढेतील योग्‍य समन्‍वय साधला जाईल, अशी अपेक्षा आहे."

- हेमंत धात्रक, सरचिटणीस, व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्था

"परीक्षेला सामोरे जाण्यासाठी इतर शहर गाठणे आव्‍हानात्‍मक असते. अशात परीक्षेच्‍या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती असते. ‘एमपीएससी’ परीक्षा अत्‍यंत सुरळीतपणे पार पडतात. या धर्तीवर सर्वप्रकारच्‍या परीक्षा प्रशासकीय यंत्रणेच्‍या माध्यमातून राबविल्‍या गेल्‍यास अनेक प्रश्‍न सुटतील. केंद्रांवर परीक्षार्थींना सन्‍मानपूर्वक वागणूक मिळणे आवश्‍यक आहे. ‘सकाळ’ ने परीक्षार्थ्यांची समस्‍या मांडल्‍याबद्दल आभार."- मानसी बागूल, परीक्षार्थी

"परीक्षा केंद्रांमध्ये किमान पायाभूत सुविधा उपलब्‍ध असणे अपेक्षित आहे. इतर शहरांतून आलेल्‍या परीक्षार्थ्यांना प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी उपलब्‍ध करण्याच्‍या अनुषंगाने नियमावली तयार झाली पाहिजे. नियमावलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रांवर पुढील वेळी परीक्षा आयोजनाची जबाबदारी दिली जाऊ नये. सर्व समाज घटकांनी परीक्षार्थ्यांच्‍या समस्‍येकडे संवेदनशीलपणे बघितल्‍यास प्रश्‍न निश्‍चित सुटतील."- पंकज खाडगीर, परीक्षार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT