लासलगाव : लासलगाव ग्रामीण रुग्णालय सलाईनवर ही रुग्णालयातील गैरसोयीची सकाळमध्ये २२ जुलैला बातमी प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने शवविच्छेदन कक्ष व बेबी वॉर्मर या दोन सुविधा तात्काळ सुरू केल्या. लासलगाव शहर विकास आघाडी व मुस्लिम फाउंडेशनने सकाळचे आभार मानले आहे. (SAKAL Impact Baby Warmer Autopsy Room Launched Lasalgaon hospital)
लासलगाव शहर विकास समिती व मुस्लिम फाउंडेशन यांनी लासलगाव रुग्णालयात सुविधा संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले होते. दरम्यान बातमी प्रसिध्द झाल्यानंतर येथे दोन डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून आता रात्रीच्या वेळेस उपलब्ध राहणार असल्याने सांगण्यात आले आहे. लासलगाव ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असून त्यासाठी १३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील, राजेंद्र कराड ,संदीप उगले, सचिन होळकर, स्मिता कुलकर्णी, माया होळकर, अर्षद शेख, फिरोज मोमीन ,मिरान पठाण, संतोष पानगव्हाणे, शहजाद पठाण यांनी दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.