A team of Central Agriculture Officers inspecting the outbreak of armyworm in the eastern region. esakal
नाशिक

SAKAL Impact News : कृषी विभागाकडून ‘लष्करी’च्या प्रादुर्भावाची पाहणी! सिन्नरच्या पूर्व भागात अधिकाऱ्यांची धाव

Nashik News : बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक कीटकनाशक औषधे उपलब्ध करून दिली जातील, असेही सांगण्यात आले.

अजित देसाई

सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मका पिकावर लष्करी अळीचे आक्रमण झाले आहे. या संदर्भातील वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाच्या अंतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर येत लष्करीच्या प्रादुर्भावाची पाहणी केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांनी पिकांवरील कीड व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक कीटकनाशक औषधे उपलब्ध करून दिली जातील, असेही सांगण्यात आले. (SAKAL Impact Inspection of army worm infestation by Agriculture Department)

सिन्नरच्या पूर्व भागात यंदाच्या खरीप हंगामात मका पिकांची जोमदार वाढ बघायला मिळते आहे. मात्र लष्करी अळीच्या आक्रमणामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण झाड पोखरणारी लष्करी अळी नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी केली जात आहे.

मात्र फवारणीचा उपयोग होत नसल्याने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी ‘सकाळ’मध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक व्यवस्थापन विभागाने लष्करी प्रादुर्भाव असलेल्या वावी, मलढोन, मिरगाव, पिंपरवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

एकात्मिक कीड व्यवस्थापन विभागाचे १५ जिल्ह्यांचे प्रादेशिक कार्यालय नाशिक येथे आहे. कार्यालयातील सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी अमित जाधव, विशाल काशीद यांनी राज्य सरकारच्या कृषी विभागाचे मंडळ अधिकारी अशोक बागूल, कृषी पर्यवेक्षक दादासाहेब जोशी, नितीन खिंडकर यांच्यासमवेत गुरुवारी सिन्नर तालुक्यात पाहणी दौरा केला.

पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पिंपरवाडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत काय आणि कशी उपाययोजना करावी, याबाबत मार्गदर्शन केले. विजय गुरूळे, हरिभाऊ कापसे, पोपट गुरुळे, बाळासाहेब हाडोळे, अमोल हाडोळे, नवनाथ शिंदे, योगेश हाडोळे, गणेश हाडोळे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते. (latest marathi news)

"किडीचा कीटक पतंग स्वरूपात येऊन पेरणीनंतर उगवलेल्या मका पिकांच्या पानावर अंडी घालतो. तेथून अळीची उत्पत्ती झाल्यानंतर ती संपूर्ण क्षेत्रात अतिशय वेगात पसरते. कामगंध सापळ्यामुळे शेतातील लष्करी अळीच्या संभाव्य प्रादुर्भावाची सूचना मिळते. एक जरी पतंग कामगंध सापळ्यात अडकला तरी पिकाचे पुढचे होणारे मोठ्या प्रमाणातील नुकसान सहजपणे टाळता येते. वेळेवर औषध फवारणी झाल्यावर हा कीडरोग नियंत्रणात आणता येतो."

- अमित जाधव, कीड व्यवस्थापन विभाग अधिकारी

"पिंपरवाडी, माळढोन, दुसंगवाडी, मीरगाव, वावी या गावांमध्ये मका पिकाची पाहणी केली असता, साधारण ४०-४५ टक्के लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. या वर्षी सिन्नर तालुक्यात १७,२९९ हेक्टर क्षेत्र मका लागवडीखाली आहे. लष्करी अळीचा वाढत्या प्रादुर्भावाला या भागात पडलेला कमी पाऊस हेसुद्धा एक कारण आहे. अळीद्वारे पुढील नुकसान टाळण्यासाठी शासनातर्फे कीटकनाशकांचे वाटप लवकरच केले जाईल. शेतकऱ्यांनी शेतातील लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यक असेल तरच या कीटकनाशकाची सामुदायिक पद्धतीने फवारणी करावी." - विशाल काशीद, सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT