NAFED, NHRDF & Jetha Bhai Ahir esakal
नाशिक

SAKAL Impact : NHRDF ची सूत्रे घेण्यास ‘नाफेड’च्या हालचाली! दिल्लीतील बैठकीत अध्यक्ष जेठाभाई अहिरांनी उचलली पावले

Nashik News : ‘नाफेड’ने उदयास आणलेली संस्था परत घेण्यास उत्सुक असून, गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष तथा ‘नाफेड’चे नवनियुक्त अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी याबाबत कठोर पावले उचलत हालचाली गतिमान केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठानने (एनएचआरडीएफ) नाफेडअंतर्गत कांदा व इतर भाजीपाला बियाणे संशोधन व विक्रीत मोलाची भूमिका बजावली. आठ वर्षांत अध्यक्ष बिजेंद्रसिंग यांनी येथे केलेला मूळ घटनेतली बदल, हुकूमशाही आणि आर्थिक कारभारविरोधात ‘सकाळ’ने केलेल्या पर्दाफाशची दखल गुरुवारी (ता. १) झालेल्या नाफेड कार्यकारिणीने घेतली.

सुरवातीपासून आखलेल्या नियमांना बगल दिल्याने दिल्लीत झालेल्या ‘नाफेड’च्या बैठकीत याबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘नाफेड’ने उदयास आणलेली संस्था परत घेण्यास उत्सुक असून, गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष तथा ‘नाफेड’चे नवनियुक्त अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी याबाबत कठोर पावले उचलत हालचाली गतिमान केल्या आहेत. (SAKAL Impact Movements of NAFED to take over sources of NHRDF)

‘एनएचआरडीएफ’चे आजीवन अध्यक्ष होऊ पाहत असलेले बिजेंद्रसिंग यांनी सूत्रे स्वीकारली, तेव्हापासून याच संस्थेत आपली मालकी कशी असेल, यावर जास्त लक्ष देत नोव्हेंबर १९७७ मध्ये झालेल्या घटनेलाच छेद देत आजीवन मालकी राखण्याच्या हिशेबाने आपल्या जवळचे मित्र, नातेवाइकांना मतदार करून घेतले. हे सर्व सुरू असताना याच बागवानी केंद्राचे शेतकऱ्यांमध्ये असलेले स्थान कमी झाले.

चितेगाव मुख्यालय असताना अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. परंतु ते दिल्लीत हलविले गेल्याने पुन्हा हे केंद्र विजनवासात गेले. याबाबत ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनीदेखील या केंद्राच्या व्याप्तीबद्दल माहिती जाणून घेत याद्वारे पुन्हा संशोधन केंद्र नाशिक येथे कार्यान्वित करून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा करून देणार असल्याचे सांगितले. या सर्व परिस्थितीत दिल्लीत झालेल्या गोपनीय बैठकीत लवकरच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे अहिर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (latest marathi news)

अहिरांकडून ‘सकाळ’चे अभिनंदन

‘नाफेड’चे नवनियुक्त अध्यक्ष जेठाभाई अहिर (भारवाड) गुजरातमधील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असून, ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांना पदभार स्वीकारून महिना झाला. परंतु ते तीन आठवडे परदेश दौऱ्यावर होते. ‘एनएचआरडीएफ’च्या कामकाजाबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी केलेल्या पोलखोलबाबत विशेष अभिनंदन करत ‘सकाळ’ समूहाचे आभार मानले.

येणाऱ्या दिवसात ‘नाफेड’ अंतर्गत ठोस पावले उचलून कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत हितकारी निर्णय घेतले जातील. बागवानी अनुसंधान केंद्राबाबत मी आग्रही असून, मागील काळात झालेल्या उलथापालथीबाबत काही दिवसांत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनादेखील याबाबत कल्पना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संचालक केदा आहेर यांनीदेखील कांदा कॅपिटल नाशिकच मुख्यालय हवे, यावर ठाम असल्याचे सांगितले.

बिजेंद्र व राजबिरसिंग या जोडगोळीने धाब्यावर बसवलेले नियम व केलेले कारनामे शोधून काढण्याचे आव्हान ‘नाफेड’समोर आहे. विशेषकरून केंद्र सरकारच्या वरिष्ठ स्तरावरून थेट ‘एनएचआरडीएफ’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त झालेल्या राजबीर

यांनी गेल्या वर्षात घेतलेले निर्णय व त्याआधी पी. के. गुप्ता यांनी केलेल्या बेकायदेशीर निर्णय व आर्थिक कारभाराच्या खोलाशी जाण्याचे आव्हान ‘नाफेड’समोर आहे. सध्या याच केंद्राचे जवळपास शंभर कोटी रुपये सहकारी बँकेत हलवले गेल्याचे समजते.

कांदा उत्पादकांना दर्जेदार उत्पादन मिळावे, हा अजेंडा असताना आलिशान गाड्या खरेदी आणि आर्थिक उधळपट्टी तसेच योजनावाटप करताना ठराविक कृषी क्षेत्रातील कंपन्यांनाच कसा फायदा होईल, याबाबत केलेल्या हातसफाईची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा शेतीक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT