नाशिक : रस्त्यांवर वाहनांची रहदारी अन् त्याचवेळी शाळा भरतात आणि सुटतात. अशावेळी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरूनच शाळेपर्यंत पोहोचावे लागते. ‘सकाळ’मधून या गंभीर विषयाला वाचा फोडताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेतली आहे.
आयुक्तांनी केलेल्या आदेशानुसार, रहदारीच्या ठिकाणी असलेल्या शाळांनजिकच्या पॉईंटवर असलेले वाहतूक शाखेचे अंमलदार तसेच पोलिस ठाणेनिहाय निर्भया, दामिनीच्या पथकांसह अंमलदारांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सोमवारपासून (ता.२३) नियुक्त केल्याचे दिसून आले. शाळा सुटल्यानंतर गेटसमोर पोलिस दादांना पाहून विद्यार्थी भारावून गेले. (SAKAL Impact Police landed outside schools)
‘रस्त्यावरच्या कोंडीने, विद्यार्थ्यांचा जीव मुठीत’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून सोमवारी (ता.२३) शहरातील विविध शाळांबाहेरील विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरतीचे छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताच्या माध्यमातून रस्त्यालगत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊनच शाळेतून बाहेर पडावे लागते वा शाळेत पोहोचावे लागते. यातून अनेकदा अपघाताच्या घडलेल्या आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातात. परंतु त्यांनाही मर्यादा पडतात. पोलिसांच्या सहकार्याचीही शाळांना अपेक्षा होती.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या बातमीची गंभीर दखल घेत, शहर वाहतूक शाखेसह आयुक्तालय हद्दीतील शाळांच्या ठिकाणी शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहतूक ठाणेनिहाय अंमलदारांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या आदेशानुसार वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सूचनेप्रमाणे, स्मार्ट रोडवरील बिटको गर्ल्स-बॉईज हायस्कूल, आदर्श हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय या ठिकाणी सोमवारी (ता. २३) सायंकाळी वाहतूक पोलिसांनी हजेरी लावत वाहतूक नियंत्रणाचे काम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वा त्यांना आपल्या शालेय व्हॅन वा रिक्षापर्यंत पोहोचणे सहज सोपे झाले. (latest marathi news)
विद्यार्थ्यांच्या हाती ‘सकाळ’
सोमवारी (ता. २३) स्मार्ट रोडवरील बिटको गर्ल्स-बॉईज हायस्कूल सायंकाळी साडेपाचला सुटली. शाळा सुटण्यापूर्वीच वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मते हे वाहतूक शाखेच्या अंमलदारांसह शाळेसमोर हजर होते. तर, आदर्श हायस्कूल येथे उपनिरीक्षक देशमुख यांच्यासह अंमलदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाळेच्या गेटसमोरील वाहने हटविण्यात आली. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बसथांब्याकडे जायचे होते त्यांना जाण्यासाठी वाहतूक नियंत्रित करण्यात आली.
"विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. ज्या शाळांच्या बाहेर वाहतूक कोंडी उद्भवते, अशाठिकाणी वाहतूक पोलिस आणि निर्भया-दामिनीचे पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांसमवेत बैठका घेऊन काही ठोस उपाययोजनाही केल्या जातील."
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
"शाळा सुटण्याच्यावेळी कोंडी समस्या असते. अशावेळी नजीकच्या वाहतूक पॉईंटवरील अंमलदारांना शाळांच्या बाहेर जाऊन वाहतूक नियंत्रित करण्याचे व विद्यार्थ्यांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत."
- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.
"परिमंडळ एकच्या हद्दीतील ज्या शाळाबाहेर वाहतूक कोंडीची समस्या आहे, अशाठिकाणी पोलिस ठाणेनिहाय अंमलदार, तसेच वाहतूक पोलिस उपलब्ध असतील. तशा सूचना पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. शाळांच्या वेळेनुसार नियोजन केले जाईल."
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक
"शाळा सुटतात त्यावेळी रस्त्यावर गर्दी होते. त्यासाठी वाहतूक पोलिस शाखांना सुचना करण्यात आल्या आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणीही झाली आहे."
- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.