SAKAL Impact : तीन दिवसांपासून पावसाच्या संततधारेने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात पाण्याचे ठिकठिकाणी डबके साचले होते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच डबके साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात ‘सकाळ’ मध्ये सोमवारी (ता. ५) वृत्त प्रसिद्ध होताच, जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पाण्याच्या डबक्यावर मुरूम टाकून ते बुजविले आहेत. तब्बल दोन महिन्यांच्या विलंबाने नाशिकमध्ये पावसाची गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू होती. ()
या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली होती. तर, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातही ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शहर- जिल्ह्यात डेंगीचा प्रादूर्भाव वाढलेला असताना, जिल्हा रुग्णालयातच पाण्याचे डबके साचल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. यासंदर्भातील ‘सकाळ’ मध्ये सोमवारी (ता. ५) ठळक वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची गंभीर दखल जिल्हा रुग्णालयाने घेतली.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पाण्याचे मोठे डबके होते. त्याप्रमाणे, बाह्यरुग्ण कक्ष आणि अपघात विभाग कक्षाबाहेर अशाप्रकारेच पाण्याचे डबके साचलेले होते. या सर्व ठिकाणी मुरुम माती टाकून हे पाण्याचे डबके बुजविण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातलगांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात डासांचा प्रादूर्भाव मोठ्याप्रमाणात आहे. त्याचा त्रास रुग्णांसह नातलग व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनाही होत असतो. यासाठी रुग्णालयाच्या आवारात नियमित डासप्रतिबंधक धूर फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.