RTO action on Bikes esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता; ...अन्‌ वळविली गाडी!

Nashik News : गाडी चालवायला यायला लागली की युवा वर्गात उमाप उत्‍साह असतो. मग काय गाडी घेऊन रस्‍त्‍यावर सुटतात पण...

सकाळ वृत्तसेवा

गाडी चालवायला यायला लागली की युवा वर्गात उमाप उत्‍साह असतो. मग काय गाडी घेऊन रस्‍त्‍यावर सुटतात. पण, या उत्‍साहावर विरजण पडताना विनोदी किस्साही घडू शकतो, याची प्रचीती मेहेर सिग्‍नल परिसरात आली. झालं असं, की असेच काही युवक दुचाकीवर मोठ्या उत्‍साहात अशोक स्‍तंभाच्‍या दिशेने येऊन सिग्‍नलवर थांबले.

नुकताच सिग्‍नलचा लाल दिवा लागला होता, अन्‌ सिग्‍नलच्‍या पलीकडे वाहतूक पोलिस थांबलेले होते. कुणी नियम मोडायला नको, यासाठी पोलिस दादा लक्ष ठेवून होते. अन्‌ या युवकांचे संपूर्ण लक्ष पोलिसांकडे होते. भिरभिरत्‍या नजरेने पोलिसांकडे पाहताना युवक पुटपुटत एकमेकांशी संवाद करीत होते.

पोलिस आपल्‍याला पकडतील, याची घालमेल त्‍यांच्‍या देहबोलीतून दिसत होती. आपण सिग्‍नलवर उभे असल्‍याचे क्षणभर हे युवक विसरले होते. त्‍यामुळे अतिउत्‍साहातील त्‍यांचा संवाद तेथे उभ्या इतर वाहनचालकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला. अखेर जोखीम न पत्करता या युवकांनी लांबूनच ‘यू टर्न’ घेत पळ काढला, अन्‌ हा प्रसंग पाहून उपस्‍थित वाहनचालकांमध्ये हशा पिकला. (Nashik SAKAL Special chalta bolta comedy traffic signal RTO)

खंडणी

काही लोकांना एकमेकांच्या शब्दांची इतकी सवय झालेली असते, की त्या शब्दांचा वारंवार उच्चार केला तरी काहीच वाटत नाही. एका शासकीय कार्यालयातील मित्रांना भेटल्यावर ही व्यक्ती नेहमीच्या शब्दांतच त्याच्याशी संवाद साधायला लागते. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर मूळ विषयावर येतात.

‘हा अर्ज भरून दे’. अर्ज भरून दिल्यावर ‘आता पुढे काय’ असा प्रश्‍न त्यांनी विचारला तर अगदी सहजपणे पुढेचा शब्द आला, ‘आता द्या खंडणी’. त्यांनीही लगेच खिशात हात घातला आणि दिले पैसे काढून. इतक्या सहजपणे खंडणी दिली म्हणून कार्यालयातील इतर कर्मचारी त्यांच्याकडे पाहायला लागले. ही मैत्री आहे, दुसरे काही नाही, असे समजल्यावर कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. (latest marathi news)

मी कुठल्या पक्षात, तेच कळत नाही

राजकीय पक्षांच्या नेत्यांची इतकी कोंडी यापूर्वी कधी झाली असेल, देव जाणो. पण, यंदा मात्र पक्ष अनेक अन उमेदवार एक अशी गत झाली आहे. त्याचे झाले असे, की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेल्या नेत्याला पुन्हा निवडणुकीत उभे राहण्याचा ‘आदेश’ आला.

आता आदेशाचे पालन तर करावे लागेल. पण, आपल्या पक्षापेक्षा सहयोगी पक्षच जास्त आग्रही असल्याचे दिसून येते. त्यामुळे मी कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नसल्याची भूमिका माजी आमदारांना घ्यावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT