On seeing Bhujbal, Hemant Godse touched his feet and took his blessings. esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! गोडसे अप्पांना भुजबळ पावले

SAKAL Special : श्रीराम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे एकमेकांसमोर आले.

सकाळ वृत्तसेवा

गोडसे अप्पांना भुजबळ पावले...

श्रीराम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे एकमेकांसमोर आले. त्या वेळी भुजबळांना पाहताच हेमंत गोडसेंनी त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.

मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात. त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसेंनी माध्यमांना दिली होती.

ज्याप्रमाणे मंदिरात देव पावला पाहिजे म्हणून आशीर्वाद घेतले जातात त्याप्रमाणे भुजबळ आणि गोडसे दोन्ही नाशिक लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत असताना गोडसेंनी भुजबळांचे आशीर्वाद घेतले अन् त्यानंतर भुजबळांनी थेट उमेदवारीच्या रेसमधून माघार घेतली. त्यामुळे गोडसे अप्पांना भुजबळ पावले, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगू लागली आहे.

(nashik SAKAL Special chalta bolta Godse Appa got Bhujbal marathi news)

अखेर भाई होर्डिंगवर झळकले

महापुरुषांची जयंती उत्सव म्हटलं, की वर्गणी व लोकसहभाग आलाच. ज्यांच्याकडून वर्गणी घेतो त्यांचा किमान फोटो होर्डिंगवर आला पाहिजे, असं आयोजकांना व वर्गणी देणाऱ्यांचीही इच्छा असते. नाशिक शहरात जयंतीनिमित्त एका भाईकडून वर्गणी स्वीकारली.

निश्चित केलेल्या वर्गणीपेक्षा भाईंकडून दुप्पट वर्गणी घेतली. मात्र, भाईंचा फोटो होर्डिंगवर आला नाही. त्यामुळे भाईंची सटकली आणि भाईंचे कार्यकर्ते वर्गणी दिलेल्या पदाधिकाऱ्याला शोधू लागले.

पदाधिकारीची धावाधाव सुरू झाली आणि अखेर एका प्रतिष्ठित व्यक्तीने भाईंची समजूत काढली. ‘भाई जाऊ द्या, एक जयंती झाली आहे, आता दुसरीपण लगेच येत आहे.’ शब्द दिल्याप्रमाणे भाईंचा फोटो होर्डिंगच्या दर्शनी भागावर सर्व ठिकाणी झळकला आणि वादावर पडदा पडला. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT