मागल्या बार भी असे फसवलं होत
कोणतेही आंदोलन म्हटले, की तिला दिशा हवी असते. वनजमिनीप्रश्नी आंदोलनकर्ते एका दिशेने आंदोलन करत असल्याचे नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनातून दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन मिटेल, असे सांगितले जात होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचे सत्र रंगले. दिवसभर पार पडलेल्या बैठका निष्फळ ठरल्या.
मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन का सुरू आहे, असे एका कार्यकर्त्याला विचारले असता त्याने ‘मागल्या बार भी, असंच फसवलं होतं आम्हास’, मात्र आता नाही फसायचे आहे आम्हास. आम्ही घेतल्याशिवाय माघार घेणारच नाय... (nashik SAKAL Special chalta bolta last time was also cheated like this marathi news )
शनिवार -रविवार अधिकारी नॉटरिचेबल
नोकरी असावी तर सरकारीच, असे उगीचच म्हटले नाही जात. कर्मचारी असो वा अधिकारी सुटीच्या दिवशी बहुतेकांचे मोबाईल स्वीचऑफच असतात. सिडकोतील काही नागरिकांची नळजोडणी कट करण्याचा धडाका कर्मचाऱ्यांनी लावला.
प्रत्यक्षात मुदत संपलेली नसताना होणारी कारवाई रोखण्यासाठी काही समाजसेवकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु शनिवार असल्याने अनेकांचे मोबाईल स्वीचऑफ आले. एका समाजसेवकाने तर थेट पालिका आयुक्तांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्यांनाही तोच अनुभव आला. थोडक्यात सुटीचा दिवस म्हटला, की अधिकारी त्यांचे मोबाईलच स्वीचऑफ करून ठेवत असल्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात याची मात्र या जबाबदार अधिकाऱ्यांना जाणीव नसावी.
अशा अधिकाऱ्यांकडे त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक वेगळे असतात अन् कार्यालयीन संपर्कासाठीचे वेगळे. अर्थात सर्वच अधिकारी असेच असतात असे नाही; पण असे अधिकारी अपवादानेच. (latest marathi news)
महिला कुठेच मागे नाहीत...
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी सिग्नलजवळ पोलिस बऱ्याचदा उभे असतात. बरेचसे नागरिक पोलिसांना पाहून रस्ता बदलतात, चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावतात. शुक्रवारी जेहान सर्कलजवळ पोलिस उभे असल्याचे एका तरुणीच्या लक्षातच आले नाही.
पोलिसांनी तरुणीला थांबवून लायसन, हेल्मेटची विचारणा करताच तरुणी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता गाडीला यू टर्न घेत पोलिसांसमोरून सिग्नल तोडून निघून गेली.
समोरून येणाऱ्या गाड्यांचा विचार न करता पोलिसांसमोरच नियम मोडत पसार झाली आणि दोघे पोलिस मात्र एकमेकांकडे पाहतच राहिले.
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, असे म्हटले जाते. आता नियम मोडण्यात महिला मागे नाहीत, असे सहजच पोलिसाच्या तोंडून बाहेर पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.