rahul gandhi  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता बोलता! अतिउत्साही कार्यकर्ता

SAKAL Special : कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, त्याचा नेता समोर भाषण देत असेल, तर त्या कार्यकर्त्यामध्ये जोश आलेला असतो.

सकाळ वृत्तसेवा

अतिउत्साही कार्यकर्ता

कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, त्याचा नेता समोर भाषण देत असेल, तर त्या कार्यकर्त्यामध्ये जोश आलेला असतो. खासदार राहुल गांधी यांची नाशिकमध्ये चौकसभा झाली. भरउन्हामध्ये सभा सुरू असतानाही खासदार गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक आले होते.

त्यात एक कार्यकर्ता सुटाबुटात आलेला होता. डोक्यावर हॅट घातलेल्या या कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता. राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान ते विरोधी पक्षावर टीका करीत असताना तो कार्यकर्ता मध्येच मोठ्याने ओरडत घोषणा देत असे, तर कधी त्यांच्या भाषणाला दाद देण्यासाठीही घोषणा देत असे.

त्याचा तो उत्साह पाहून आजूबाजूचे नागरिकही त्याच्याकडे पाहत त्याच्या उत्साहाला आणखीच प्रतिसाद देत होते. या प्रतिसादाने मात्र काही काळ वातावरणात रंगत आली होती.

(nashik SAKAL Special chalta bolta overexcited worker marathi news)

अजून मेहनत घ्यावी लागेल

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार म्हणून द्वारका ते शालिमारपर्यंत शहरातील नेत्यांकडून मोठमोठे स्वागतपर फलक लावण्यात आले होते. द्वारका परिसरात दुभाजकांमध्ये लावण्यात आलेले असेच काही फलक राहुल गांधी यांच्या प्रवेशापूर्वीच पडले होते.

फलक बघून परिसरात नियुक्तीस असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी हे तर आत्ताच पडले आहेत, पाया अजूनही कच्चाच राहिला आहे, मेहनत घ्यावी लागेल, असे उद्गार काढताच परिसरात जमलेल्या नागरिकांमध्ये हशा पिकला. ( latest marathi news )

...अन् मॅडमचा आवाज बसला

हिवाळा संपण्यापूर्वी आणि उन्हाळा सुरू होण्याच्यादरम्यान वातावरणात बदल होऊन लहान मुलांना वेगवेगळे आजार होतात. त्यातीलच एक आजार म्हणजे गालभोंगे. दोन्ही गाल मानेच्या बाजूने सुजल्यामुळे जेवण करताना थोडा त्रास होतो. असाच त्रास होऊ लागल्याने एका शिक्षिकेने मुख्याध्यापकांकडे सुटीची मागणी केली.

पण शिक्षकांची संख्या कमी असल्याने त्यांनी रजेला नकार दिला व शाळेत यायला सांगितले. शाळेत आल्यानंतर शिक्षिकेला कळले, की आज सरांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी बुंदीचे लाडू आणि कुरमुरे आणले आहेत. त्यांनी सर्व शिक्षकांना लाडू वाटले.

पण ‘गाल भोंग्या’वाल्या बाईंना सोडून. तेव्हा सर्व शिक्षकांना कळले, की मॅडमने सकाळी सुटी मागितली होती. पण झाकली मूठ सव्वालाखाची म्हणून त्यांनी कुणालाच ही गोष्ट कळू दिली नाही. मुख्याध्यापकांनी पोलखोल केल्यानंतर मॅडमचा आवाजच बसला, आता बोला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT