गोदाआरतीनिमित्ताने भाविकांसह साधू-महंतांनाही अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात दोन्हीकडील संघटनांमध्ये चढाओढ रंगली आहे. आरतीसाठी आलेले एका विशेष पाहुण्याच्या हाती आयोजकांनी फुलांनी भरलेले आरतीचे ताट दिले.
पण त्यात दिवाच नसल्यामुळे आरती ओवाळणार तरी कशी म्हणून पेच निर्माण झाला. अखेर आयोजकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी धावपळ करत दिवा मिळवून दिला आणि आरतीचे घोडे गंगेत न्हाले. (nashik SAKAL Special chalta bolta marathi news)
निवडणुका आल्या आहे रे...
लोकसभा निवडणुकीची सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून, दोन गट झाले आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेससह गट झालेल्या पक्षाकडून कार्यक्रम साजरे केले जात आहेत. शिवजयंती सर्वच राजकीय पक्षांनी धुमधडाक्यात साजरी केली.
यात निवडणुका असल्याने सर्वच मंडळांत राजकीय नेत्यांचा वावर दिसत होता. असेच एका मोठ्या मंडळात शिवजयंती साजरी करण्यासाठी राजकीय नेत्यांची रेलचेल सुरू होती. दिवसभरात विविध पक्षांमधील नेते, पुढाऱ्यांनी हजेरी लावत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
सायंकाळी मंडळापुढे तर नेत्यांची राग लागली होती. हे चित्र पाहून एका मित्राने दुसऱ्या मित्रास सांगितले, की यंदा तर मंडळात राजकीय नेत्यांची लईच गर्दी झाली. त्यावर दुसरा मित्रा लागलीच म्हणाला, की अरे बाबा निवडणुका आल्या आहे रे... गर्दी तर होणार. आपल्याला काय करायचे. चल दर्शन घे, असे सांगत दोघांनीही मंडळातून काढता पाय घेतला.
त्यांचे नावच ‘नायंटी’ आहे...!
नुकताच शहरात एका व्यावसायिक संघटनेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या शहरांतून सदस्य आले होते. या सर्वांना कायम स्मरणात राहील, असा रंजक किस्सा उद्घाटन समारंभानंतर व्यासपीठामागील ग्रीन रूम परिसरात घडला. राष्ट्रीय अध्यक्ष आलेले असल्याने पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती.
मात्र एका पदाधिकाऱ्याचा काही शोध लागत नव्हता. फोनद्वारेही संपर्क झाला नाही. मग काय उपस्थितांनी त्याच्या नावाने आवाज द्यायला सुरू केली. ‘नायंटी, उधर है क्या', 'वो नायंटी किधर गया, उसको इधर बुलाओ' असे उपस्थितांपैकी काहींनी आवाज दिले.
आता ‘नायंटी’ हा शब्द ऐकल्यानंतर अन्य उपस्थितांचे लक्ष भलतीकडेच (मधुशाळेकडे) गेले अन् हास्य फवाऱ्यांसह कुजबूज सुरू झाली. उत्सुकतेत एकाने प्रश्न विचारलाच, की त्यांना ‘नायंटी’ का म्हणताय. त्यावर ते उत्तरले, ‘नायंटी’ असे त्यांचे नावच आहे. या संवादादरम्यान उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. (Latest Marathi News)
सगळं बरोबर होतं...
राजकीयदृष्ट्या सतत जागरूक म्हणून पाथर्डी गावाची ओळख आहे. येथील राजकारणदेखील टोकदार असते. काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती गावाचा उत्सव म्हणून राजकारणविरहित साजरी केली जायची. गतवर्षापर्यंत धूमधडाक्यात सर्व कार्यक्रम साजरे झाले. यंदादेखील उत्साह होता.
मात्र गावातील माजी नगरसेवक आणि इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याने यंदाच्या कार्यक्रमात या आपापसांतील मनभेदांचीही चर्चा होती. त्याचा परिणाम कार्यक्रमाच्या गर्दीवरही दिसत होता. याच अनुषंगाने चर्चा सुरू असताना एकाने गावातील प्रतिष्ठित पुढाऱ्याला विचारले, की हे असे का झाले, यंदा गर्दी पाहिजे तितकी का नाही.
तेव्हा ते म्हणाले, की अहो काय करता सगळं बरोबर होतं. आतापर्यंत एकोप्याची गवताची पेंढी घट्ट बांधलेली होती. यंदा मात्र काही किरकोळ कारणामुळे ही गवताची पेंढी सुटली. त्यामुळे सगळ्या काड्या इकडे-तिकडे पसरलेल्या दिसत आहेत. माहीत नाही या काड्या आता कधी एकत्र येतील आणि परत ही पेंढी पुन्हा कधी बांधली जाईल. हे ऐकल्यावर उपस्थितांनी एकदम बरोबर अशी प्रतिक्रिया नोंदवत एकच हशा पिकला. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.