signals  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! सिग्नलला डावीकडे वळतात इतकचं माहीत

SAKAL Special : साधारपणे ट्रॅफिक सिग्नल लाल असल्यास आपण डावीकडे वळू शकतो, असे वाहन चालविणाऱ्या बहुतांशी लोकांना माहीत असते.

सकाळ वृत्तसेवा

सिग्नलला डावीकडे वळतात इतकचं माहीत...

साधारपणे ट्रॅफिक सिग्नल लाल असल्यास आपण डावीकडे वळू शकतो, असे वाहन चालविणाऱ्या बहुतांशी लोकांना माहीत असते. त्यामुळे सिग्नल जरी लाल असला तरी डावीकडे वळणारी मंडळी बिनधास्त गाडी पुढे हाकतात.

नाशिक शहरातील सीबीएस, मेहेर अशा प्रमुख भागात सिग्नलच व्यवस्थापन थोडं चकित करणार असं आहे. कारण ते सिग्नल लाल असताना ते डावीकडे वळा म्हणतात पण काही क्षणांसाठी, त्यातचं वाहनचालक गंडतो अन् पोलिस दादाला सामोरे जातो.

मग काय दंडांची रक्कम ऐकल्यावर पोलिस दादाला विनंती, कोणालातरी फोन, वाद अन् पुढे कसातरी तिढा सुटतो. मात्र या सर्वांत आधी नाशिककरांना या सिग्नल यंत्रणेच्या कामकाजाची माहिती करून देण्यासाठी नेमका पुढाकार कोणत्या प्रशासकीय कार्यालयाने घ्यावा हा प्रश्न कायम राहतो.

(nashik SAKAL Special chalta bolta signal is known to turn left marathi news)

महेश हिरे यांना आमदार झाल्याचा फिल

सध्या सिडको इंदिरानगरमध्ये आमदार सीमा हिरे यांच्या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा सुरू आहेत. त्या धावपळीत त्यांची तब्येत बिघडल्याने काही ठिकाणचे कार्यक्रम पतीदेव महेश हिरे यांना पार पाडावे लागत आहेत.

अशाच एका कार्यक्रमासाठी वासननगर येथे ते आले. उपस्थित इतर पाहुण्यांची भाषणे झाल्यानंतर शेवटचे भाषण करण्याचा मान मग त्यांना मिळाला. ते उभे राहिले आणि म्हणाले की,आमदार स्वतः राहिल्या की मी भाषण करत नाही.

आज त्या नाहीत म्हणून बोलावे लागत आहे. त्यामुळे काही क्षण का असेना आमदार झाल्याचा फील मला येत आहे. हे ऐकल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि एकच हशा करत हिरे यांना दाद दिली. (latest marathi news)

साहेबांनी मंत्र दिला अन् सैनिकाचा संयम सुटला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्षाच्या १८ व्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणात त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र त्यानंतर तीनच दिवसांत पुण्यातील मनसेचा कट्टर सैनिक मानल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

नाशिकमधील मनसेत गटबाजी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साहेबांच्या या सल्ल्यानंतर जसा काही दिवसांतच पुण्यातील मनसैनिकाचा संयम सुटला तसं नाशिकमधेही होऊ शकतं, अशी चर्चा मनसेप्रेमी नागरिक गांभीर्याने करू लागले आहेत.

आता वाजले की बारा...

ग्रामीण भागात आजही तमाशाची ‘क्रेझ’ कायम आहे. यात्रोत्सव सुरू झाला, की कुस्त्यांची दंगल आणि तमाशाचा फड रंगतो म्हणजे रंगतोच. महाशिवरात्रीनिमित्त एका गावात लोकप्रिय तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पाहुण्यांना मिळते. त्यादृष्टीने नियोजन करून पाहुणे सायंकाळी गावात दाखल होतात.

रात्रीचे जेवण झाल्यावर जरा फेरफटका मारून येतो म्हणून पाहुणे अलगदपणे तमाशाच्या फडाची वाट धरतात. घरात झोपलेल्या मंडळीला ही गोष्ट लक्षात येते आणि ती हळूच आपल्या ‘धनी’च्या मागे मागे जाते. गर्दी फार असल्यामुळे आपल्या ‘धन्या’चा शोध काही लागत नाही.

इतक्यात ‘मला जाऊ द्या ना घरी’ ही लावणी सुरू होते आणि ‘पाहुणे’ जागेवरून उठून शिट्या वाजवायला लागतात. ही गोष्ट ‘लक्ष्मी’च्या धान्यात येते अन्‌ ती लगेच धन्याची कॉलर पकडून घरी घेऊन जाते. आता कोणाचे बारा वाजले असतील काय माहिती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT