halmate esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! म्हणून मी हेल्मेट घातले

SAKAL Special : दुचाकी चालविताना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असते ते हेल्मेट... दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

...म्हणून मी हेल्मेट घातले

दुचाकी चालविताना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असते ते हेल्मेट... दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे. हेल्मेट नसल्याने पोलिस थेट कारवाई करतात. या मागचा उद्देश सुरक्षितता हाच असतो. तरीही काही महाभाग असे असतात, की जे या नियमांना धाब्यावर बसवतात. सध्या शहरात हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

मात्र त्यात अनोखी गोष्ट म्हणजे हेल्मेट घातलेल्या व्यक्ती त्या हेल्मेटमध्ये मोबाईल अडकवून दुचाकी चालवताना मस्तपैकी फोनवर बोलत प्रवास करतात. शहरातील मुख्य अशा मेहेर चौकात एक महिला सिग्नलवर थांबली असता हेल्मेटमध्ये मोबाईल अडकवलेला एका सद्‍गृहस्थाने पाहिले आणि त्यांना विचारले, की मॅडम हेल्मेटमध्ये मोबाईल का अडकवला आहे?

त्यावर मॅडम लगेच म्हणाल्या, अहो, काका गाडी चालवताना मोबाईल हेल्मेटमध्ये व्यवस्थित अडकून राहतो, बोलणेही होतं आणि पोलिसदेखील पकडत नाही म्हणून मी हेल्मेट घालते. हेल्मेटचा या महिलेकरवी होणारा असा बहुपयोग पाहून त्या सद्गृहस्थांनी आपली वाट धरली.

(nashik SAKAL Special chalta bolta So i put on helmet marathi news)

हा ३१ मार्च कधी संपेल...

शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी किती काम करता या तसाही संशोधनाचा विषय आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले अधिकारी, कर्मचारी टेबलावर भेटत नाही, भेटले तरी, शासकीय काम सहा महिने चा अनुभव सर्वसामान्यांना येतो. झाले असे की, जिल्हा परिषदेत ३१ मार्चची लगीनघाई सुरू आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधी खर्चासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. निधी वेळात प्राप्त होऊनही तो वेळात खर्च होत नाही. त्यामुळे मार्च महिन्यात निधी खर्चासाठी धावपळ केली जाते. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे.

त्यामुळे निधी खर्चासाठी अवधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेने शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू ठेवण्याचे फर्मान काढले आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३१ मार्च कधी संपेल अशीच ओरड होत आहे.  (latest marathi news)

गुड मॉर्निंगसाठी चार्ज लागणार

सध्या प्रत्‍येकाच्‍या दिवसाची सुरवात अन्‌ शेवटही व्‍हॉट्‌सॲप बघूनच होतो. ओघानेच सकाळची सुरवात ‘गुड मॉर्निंग’ आणि रात्री निरोप देताना ‘गुड नाइट’चा वापर बहुतांश सर्वजण करतात. यात हौशीदेखील आलेच. सध्या सोशल मीडियावर व्‍हायरल होत असलेला एक मेसेज अशा हौशींसाठी चिंतेचा अन्‌ इतरांसाठी गमतीचा विषय बनलाय.

झालं असं, की अशाच एका हौशी महिलेला व्‍हॉट्‌सॲपवर मॅसेज आला, की पुढील महिन्‍यापासून ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठविण्यासाठी चार्जेस लागणार आहेत. अत्‍यंत कुतूहलाने ती याबाबत चौकशी करत होती.

इतर काहींसोबत तिने ही माहिती शेअर केली अन्‌ उपस्‍थितांना खिदखिदायचे कारणच भेटले. लोटपोट हसून झाल्‍यानंतर हा मेसेज चार्जेसचा नसून तर एप्रिल फुलचा आहे, अशी स्‍पष्टोक्‍ती दिल्‍यानंतर महिलेला चिंता विसरत हसू उमलवले.

मला घेऊन चला..!

रस्त्याच्या कडेला भीक मागणारे भिकारी दिसले की प्रत्येकाची मदत करण्याची इच्छा होते. पण कधी कधी सर्वसामान्यांची अवस्था इतकी वाईट असते, की बाहेरून सामान्य आणि खिशात दमडी नसते. नाही म्हटले तरी आज प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही समस्या आहेत. त्यातच एक आजी फोनवर बोलत असणाऱ्या तरुणाकडे गयावया करून भीक मागत होती.

पण बिचारा तरुणच इतका तणावात होता, की तो आजीला मलाच घेऊन चला म्हणून सांगू लागला..! भीक मागणाऱ्या आजीलाही खजील झाल्यासारखे वाटले आणि तिने पुढची वाट धरली. तरुणही हतबल होऊन त्याच्या वाटेने निघून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT