Code Of Conduct Sakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! तुम्हीही आचारसंहिता पाळा, घरी येण्याची

SAKAL Special : निवडणुकीच्या निमित्ताने सध्या आचारसंहिता हा शब्द अधिक चर्चेला आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

तुम्हीही आचारसंहिता पाळा, घरी येण्याची

निवडणुकीच्या निमित्ताने सध्या आचारसंहिता हा शब्द अधिक चर्चेला आला आहे. राजकीय नेते तसेच सरकारी अधिकारी व कंत्राटदार यांच्यासाठी तर आचारसंहिता म्हणजे कामे न करण्यासाठी एक पर्वणीच म्हणायला हवी.

शनिवारी (ता. १६) दुपारी तीननंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सात टप्प्यांमध्ये मतदान जाहीर केले. यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेत नवीन कार्यारंभ आदेश देता येत नाही, मतदारांना प्रलोभन होईल असे वक्तव्य किंवा घोषणा करता येत नाही.

आचारसंहिता हा शब्द घरोघरी पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच राजकारणी लोकांना मर्यादा आल्या आहेत, तसेच मर्यादा घरातही आल्या आहेत.

निवडणूक जाहीर होत असताना इकडे काही नवरोबांना घरूनच तंबी आली. आचारसंहिता लागू झाली आहे; पण ती तुम्हीही पाळा, घरी वेळेवर या... हे ऐकून शासकीय कर्मचारी असलेल्या नवरोबाने डोक्याला हात मारून घेतला.

(nashik SAKAL Special chalta bolta You also follow code of conduct to come home marathi news)

आचारसंहितेचा बाऊ अंगाशी...

आचारसंहितेत शासकीय देयकांची रक्कम अदा करता येत नाही, असा तर्क नकारात्मक भूमिकेतून लावला जातो; परंतु त्याचा गैरफायदा घेताना अनेक जण दिसतात. नुकताच एका राजकीय पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे लावण्याबरोबरच विविध साहित्य भाडेतत्त्वावर घेतले.

मात्र, आता त्याचे बिल देण्याची वेळ आल्यावर आचारसंहितेत बिल देता येत नाही, अशी थाप मारून वेळकाढूपणा केला. मात्र, पैसे घेणाराही बहाद्दर ठरला. निवडणूक आयुक्तांना फोन करीत पक्षाच्या श्रेष्ठींना घटनेची माहिती दिल्यावर काही पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली व खिशात होते नव्हते तेवढे पैसे देऊन वेळ मारून नेली. (latest marathi news)

चहाची जबाबदारी आमची नाही...

एका राजकीय पक्षाची पत्रकार परिषद नुकतीच झाली. माध्यम प्रतिनिधींना संबोधित करण्यासाठी माजी आमदार येणार असल्‍याने त्‍यांची वाट पाहत पदाधिकारी व पत्रकार थांबले होते. पण, याच वेळी हॉटेल व्‍यवस्‍थापनाचा गलथान कारभार विनोदाचा अन्‌ काहीसा हताश करणारा विषय ठरला.

झालं असं की उपस्‍थितांसाठी चहा-बिस्किटाची व्‍यवस्‍था केलेली होती. पदाधिकारी येण्यास वेळ असल्‍याने हॉटेलच्‍या कर्मचाऱ्याने बिस्‍कीट आणून ठेवले. पण, तयार नसल्‍याने चहा येण्यास विलंब होत होता. पत्रकार परिषदेनंतर तरी झटकन उपस्‍थितांना चहा वाटप होईल, अशी पक्ष पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. तसं हॉटेलच्‍या कर्मचाऱ्याला फर्मानही सोडले.

पण, ‘चहा द्यायला सांगितले आहे. वाटपाची जबाबदारी आमची नाही’ असं म्‍हणत कर्मचाऱ्याने हात झटकले. अन्‌ या विनोदी किस्स्याने सभागृहात हशा पिकला. इतक्‍यात ‘सर्व्हिस नाही, यांना पैसेच देऊ नका’ असे हलक्‍या स्‍वरात म्‍हणत संबंधित पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. पण, हा किस्सा उपस्‍थित सर्वांसाठीच मनोरंजनाचा ठरला.

अरे, आपण एकत्र आहोत यार...

लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे स्वतंत्र मेळावे, बैठका सुरू होत्या.

जागा वाटप व उमेदवारीचा घोळ सुरू असताना आता महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकत्र मेळावे, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यात तीन पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत आहेत. एकमेकांसमोर ठाकलेले कार्यकर्ते एकत्र येताना अवघड जात आहे.

शहरात असाच महाविकास आघाडीच्या युवा शाखेच्या मेळाव्यात, तिन्ही पक्षांतील युवा संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले. मेळाव्यास गर्दी झाल्याने खुर्च्या नसल्याने गैरसोय होत होती. त्यावेळी एका कार्यकर्त्यांनी, खुर्चीवर बसलेल्या कार्यकर्त्यास जागा मागितली.

मात्र, त्याकडून प्रतिसाद येईना. त्या वेळी त्या कार्यकर्त्यांने ‘अरे आपण आता एकत्र आहोत यार, जागा दे, एका खुर्चीवर बसू’ अशी साद घातली. त्या वेळी त्या कार्यकर्त्यालाही खुर्चीवर भागीदारी करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT