नरकोळ : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून चंदनसिंग राजपूत रोज मुल्हेर परिसरात सकाळपासून पायी खमंग ढोकळ्याची विक्री करतात. त्यांची पायपीट बघून पोटाचा प्रश्न हाल सहन केल्याशिवाय सुटत नाही, हे अधोरेखित होते. (Nashik khaman dhokla Chandan Singh in Narkol Jakhod area marathi news)
खमंग व ढोकळा विक्रीतून मिळणारी काही रक्कम गावी घरी पाठवून त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहेत. गावागावांत चंदनसिंग खमणवाला नावाने ते परिचित आहेत. चविष्ट खमण ढोकळ्यांसाठी चिमुकले चंदनसिंगची आतुरतेने वाट पाहतात.
एका गावाला आठवड्यातून एकदाच चंदनसिंग जातो. आम्ही तीन जणांनी गावाची वाटणी केली असून, मुल्हेर वाघबा, साल्हेर, अंतापूर, पिंपळकोठे, मांगीतुंगी, चिखलीबारी, नरकोळ, जाखोड, मुंगसे, असा भाग आठवड्यातून एकदा जातो. तेही पायी. वाहनाने खमंग ढोकळाचे नुकसान होते.
तुकडे झाल्यास ग्राहक हात लावत नाही. त्यामुळे सकाळी अकरापर्यंत हा व्यवसाय करून आपल्या मुळ ठिकाणी येऊन माल तयार करतो. ग्राहकांना रोज ताजा खमण ढोकळा दिल्याने विक्री चांगली होते, असे चंदनसिंग राजपूत यांनी सांगितले. (latest marathi news)
कसा तयार होतो ढोकळा
प्रथम बेसन, रवा, मीठ साहित्य एकत्र करून भांड्यात दोन ते तीन कप पाणी घालतो. मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवतो. प्लेट ठेवण्यापूर्वी ढोकळा बनविण्याचे भांडे किमान ५ मिनिटे गरम करातो. मोठ्या भांड्यात बेसन, रवा, लिंबाचा रस, हिरवी मिरची-आलं पेस्ट, दहीपाणी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालतो.
पिठात गुठळ्या राहणार नाहीत, अशाप्रकारे मिसळतो. नंतर काही वेळाने खमंग ढोकळा तयार होतो. पिवळे दिसण्यासाठी मसाला कलर वापरतो. खमंग ढोकळा २०० रुपये किलोने विकला जात असल्याचे राजपूत यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात...
१० किलो खमंग ढोकळासाठी हजार रुपये खर्च
बेसनपीठ, रवा, ८०० रुपये
मीठ, तेल, लाकूड, मोहरी २०० रुपये
"गावाकडे जमीन कमी आहे. मात्र काम नाही, म्हणून गेल्या सहा ते सात वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. त्यातून दोन पैसे मिळतात. चविष्ट खमंग ढोकळा देत असल्याने चिमुकले माझी आतुरतेने वाट पाहतात." - चंदनसिंग राजपूत, मथुरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.