Salher Fort esakal
नाशिक

Nashik Salher Fort: पावसामुळे लांबला ‘युनेस्को’चा साल्हेर पाहणी दौरा; जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे पाहणी

Salher Fort : १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने ‘युनेस्को’ची समिती लवकरच साल्हेर किल्ल्याची पाहणी करण्यासाठी नाशिकला येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने ‘युनेस्को’ची समिती लवकरच साल्हेर (ता. बागलाण) किल्ल्याची पाहणी करण्यासाठी नाशिकला येत आहे. त्यांच्या दौऱ्याला परतीचा पाऊस व दाट धुक्यांमुळे विलंब झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला असलेल्या साल्हेरचा हेलिकॉप्टरद्वारे सर्व्हे होणार असल्याने त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Salher inspection tour of unesco delayed due to rain in district)

गडसंवर्धन संघटनेने यात सहभाग नोंदवत साल्हेरची स्वच्छता केली. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून गावा-गावांमध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. तसेच, राज्यातील १२ किल्ल्यांविषयी माहिती देणारे ‘स्टॅण्डी’ तयार करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालयांत जाऊन या किल्ल्यांविषयी जनजागृती व प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी केली जात आहे. जिल्हास्तरीय महावारसा समिती या सर्व घटना व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील ११ व कर्नाटकमधील एका किल्ल्याची पाहणी करण्यासाठी ‘युनेस्को’ची टीम २७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात दाखल झाली. (latest marathi news)

परंतु, गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने पाहणी समितीचा दौरा अद्याप पूर्ण झालेला नाही. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी वातावरणाचे दैनंदिन अपडेट या समितीला कळवत आहेत. मंगळवारी (ता. १) समितीचा दौरा होणे अपेक्षित होते. हवामान अनुकूल होताच पुढील दोन-तीन दिवसांत समितीचा दौरा निश्‍चित होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

‘साल्हेर’ची वैशिष्ट्ये

साल्हेर किल्ल्याची उंची पाच हजार १४१ फूट असल्याने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून किल्ल्याची पाहणी होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक लढाईत साल्हेरचे व त्याच्या लष्करी स्थापत्याचे महत्त्व विचारात घेऊन या किल्ल्याची निवड झाली आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी ठरविण्यात आलेल्या निकषांची पडताळणी होईल. यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने समित्यांची स्थापना केली. त्यात जिल्हास्तरीय महावारसा समितीत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह १४ सदस्यांचा समावेश आहे; तर स्मारकस्तरीय महावारसा समितीत तहसीलदार, सरपंच यांच्यासह सात सदस्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT