Nashik MD Drug Case : सामनगावातील एमडी ( मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्रीप्रकरणाची पाळेमुळे सोलापूरपर्यंत खणून काढताना नाशिक शहर पोलिसांनी केरळमधून एका संशयिताला अटक केली आहे.
त्याने बनावट जीएसटी कागदपत्रांच्या आधारे हैदराबादमधून खरेदी केलेले दोन हजार लिटर रसायन सोलापूरच्या कारखान्यात पाठविल्याचे तपासातून समोर आले आहे.
दरम्यान संशयिताला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nashik samangaon Drug Case 2 thousand liters of chemical sent to Solapur for MD Transactions through fake GST documents Crime)
मोहम्मद अरजास एम. टी. (रा. कोझिकोडा, केरळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सामनगाव परिसरात गेल्या ७ सप्टेंबर रोजी एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी पोलिसांनी गणेश शर्मा यास अटक केली होती.
या गुन्ह्यांच्या मुळाशी जाताना नाशिक शहर पोलिसांनी सोलापूरातील दोन कारखाने उदध्वस्त करीत लाखोंचा एमडीचा साठा जप्त केला आहे. या कारवाई हजारो लिटर रसायन आणि कच्चा मालही पोलिसांनी जप्त केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना शहर गुन्हेशाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकाने दोन महिने कसून तपास करीत सोलापूरपर्यंतचे धागेदोरे शोधले. संशयित सनी पगारे, अर्जून पिवाल टोळीला गजाआड करीत त्यांचे सोलापूरातील दोन एमडीचे कारखानेही उदध्वस्त केले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत फड व हेमंत नागरे यांचे पथक सखोल चौकशी करीत असताना केरळमधून संशयित मोहम्मद यास अटक केली.
त्याच्या चौकशीतून त्यानेच एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रसायन सोलापूरच्या कारखान्यात पुरविले होते. आत्तापर्यंत याने हैदराबाद येथून २ हजार लिटर रसायन खरेदी करून सनी पगारे यास सोलापूरला पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बनावट कागदपत्रे, कंपनी
हैदराबाद येथून रसायन खरेदी करण्यासाठी आवश्यक तो परवाना लागत असल्याने त्यासाठी संशयित मोहम्मद याने केरळमध्ये एक बनावट केमिकल औद्योगिक कंपनीची कागदोपत्री तयार केली.
त्यावरून त्याने बनावट जीएसटी व अन्य कागदपत्रे बनवून त्याआधारे त्याने हैदराबादमधून रसायन खरेदी केले होते.
मुख्य संशयिताच्या संपर्कात
संशयित मोहम्मद हा चैन्नईच्या कारागृहात असताना त्याची ओळख या गुन्ह्यातील फरार असलेल्या मुख्य संशयिताशी झाली होती.
फरार संशयित हा अंमलीपदार्थांच्या तस्करीतच अटक होता. या संपर्कातूनच त्याचा सनी पगारे-अर्जून पिवाल यांच्याही संपर्कात आला.
फरार संशयिताचा पोलिस कसून शोध घेत असून, त्याच्या अटकेनंतर महत्त्वाची माहिती पोलिसांच्याहाती लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.