Inauguration at MUHS esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : समीर भुजबळ शुभेच्‍छा स्‍वीकारण्यासाठी उभे : मंत्री छगन भुजबळ; महायुतीतील चर्चांना दिला पूर्णविराम

Latest Political News : यासंदर्भात मंत्री भुजबळ यांना प्रश्‍न विचारला असता, ‘उमेदवारीचे संकेत वैगेरे काही दिलेले नाहीत. ते गडावर देवीदर्शनाला गेले असून, देवीमाताचा आशीर्वाद घेत आहेत. शुभेच्‍छांसाठी उभे राहातीलच ना... निवडणुकीसाठी नाही,’ अशी प्रतिक्रिया देताना वादाला पूर्णविराम दिला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माजी खासदार समीर भुजबळ यांच्‍या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्‍या पोस्‍टमुळे महायुतीच्‍या पक्षांमध्ये सुंदोपसुंदी बघायला मिळाली. यासंदर्भात मंत्री भुजबळ यांना प्रश्‍न विचारला असता, ‘उमेदवारीचे संकेत वैगेरे काही दिलेले नाहीत. ते गडावर देवीदर्शनाला गेले असून, देवीमाताचा आशीर्वाद घेत आहेत. शुभेच्‍छांसाठी उभे राहातीलच ना... निवडणुकीसाठी नाही,’ अशी प्रतिक्रिया देताना वादाला पूर्णविराम दिला. (Chhagan Bhujbal clearified about bhuse)

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्‌घाटन कार्यक्रमानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ उपस्‍थित होते. कार्यक्रम संपल्‍यानंतर त्‍यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शुभेच्‍छांतून नांदगाव मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत दिले असल्‍याच्‍या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, संकेत वैगेरे काही नाही.

सर्व पक्ष मिळून महायुतीसाठी आम्‍ही सर्व काम करतो आहोत. यापुढेही सर्व मिळून काम करणार आहोत. उमेदवारीबाबत संकेत दिले, हा तर्क माध्यम प्रतिनिधींनी काढला असून, तसे काही नसल्‍याचे नमूद केले. नांदगावमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्‍याच्‍या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, की समीर भुजबळ गडावर दर्शनासाठी गेले आहेत. (latest marathi news)

यानिमित्त ते आशीर्वाद, शुभेच्‍छा स्‍वीकारत आहेत. आम्‍ही महायुतीचे सर्व गड राखताना सध्यापेक्षा अधिक आमदार आम्‍हाला जिल्ह्यातून निवडणून आणायचे आहेत. यादृष्टीने आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. नरहरी झिळवाळांबाबतच्‍या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, की झिरवाळ यांनी यापूर्वी त्‍यांची भूमिका स्‍पष्ट केली असून, अफवांवर विश्‍वास ठेऊ नये.

हरियानातील भाजपच्‍या यशाबद्दल म्‍हणाले, की हरियाना एक्‍झिट पोलमध्ये वेगळेच चित्र दाखविले जात होते. मात्र शेतीबाबत अग्रेसर असलेल्‍या हरियानामध्ये भाजपने मिळविलेला विजय अतिशय मोठी गोष्ट आहे. या निकालातून देशाचा मूड लक्षात यायला सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री भुजबळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT