नाशिक : कच्या-पक्या रस्त्यांवर सुसाट सुटलेल्या दुचाकी... खड्डे अन् वळणांवर कसब पणाला लावत तोल सांभाळताना दुचाकीस्वार... असे थरारक चित्र घोटी-वैतरणा रोडवरील धरनोली परिसरात रविवारी (ता. ७) बघायला मिळाले. भरधाव धावणाऱ्या दुचाकीतून निघणाऱ्या व्रूमऽऽ व्रुमऽऽऽ आवाजाचा थरार अन् हृदयाचा ठोका चुकविणारे क्षण क्रीडाप्रेमींनी अनुभवले. स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केलेल्या पेट्रोनास टीव्हीएसच्या सॅम्युएल जेकॉबच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. (nashik MRF Mogrip National Motorcycle Rally news)
ए डब्ल्यू इव्हेंट आयोजित एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय दुचाकी स्पर्धेची पहिली फेरी उत्साहात पार पडली. स्पर्धेतील पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग आणि हीरो मोटर्सच्या खेळाडूंचा सहभाग लक्षवेधी ठरला. धरनोली गावापासून सकाळी साडेसातला स्पर्धेला सुरवात झाली. एकूण ५६ किलोमीटर अंतरामध्ये स्पर्धा रंगली.
१४ किलोमीटरच्या चार सरळ फेऱ्या झाल्या. संपूर्ण स्पर्धेनंतर आघाडी घेण्यासाठी दुचाकीस्वारांमध्ये चढाओढ लागली होती. त्यातच कच्या रस्त्यावरून तोल सांभाळताना अनेक चालकांची गाडी घसरली. तितक्याच चपळतेने पुन्हा स्पर्धा मार्गावर गाडी आणताना चालकांनी शेवटपर्यंत विजेतेपदासाठी लढत दिली.
विविध दहा गटांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात आली. या वर्षी विक्रमी ९० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये पाच महिला चालक होत्या. रॅलीचे क्लार्क ऑफ दि कोर्से तथा ए. डब्ल्यू इव्हेंटचे संस्थापक अमित वाघचौरे यांनी केले. रॅलीमध्ये मुख्य निरीक्षक म्हणून समीर बुरकुले, मनोज जोशी, मनीष चिटको यांनी काम पाहिले. स्पर्धा संबंध अधिकारी म्हणून हर्शल कडभाने यांनी जबाबदारी सांभाळली. (latest marathi news)
क्रीडाप्रेमींनी केली गर्दी
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी क्रीडाप्रेमींना स्पर्धा मार्गावर प्रवेश देण्यात आला. स्पर्धेदरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. सकाळी लवकर स्पर्धास्थळ गाठत क्रीडाप्रेमींनी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. स्थानिक पाड्यांवरील काही चिमुकल्यांनी थेट झाडाच्या फांद्यांवर ठाण मांडून स्पर्धेचा थरार अनुभवला.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे (कंसात टिम/शहराचे नाव)
क्लास १ ः सुपर बाईक, ४५० सीसी (प्रो-एक्स्पर्ट)- सॅम्युअल जेकॉब (पेट्रोनास टीव्हीएस)
क्लास २ ः सुपर बाईक, ४५० सीसी (एक्सपर्ट)- नटराज आर. (बंगळुरू)
क्लास ३ ः सुपर स्पोर्टस १६५ सीसी - अब्दुल रेहेमान (शिमोगा)
क्लास ३.३ ः सुपर स्पोर्टस १६५ सीसी - धीरज एच. (शिवमोगा)
क्लास ४ ः सुपर स्पोर्टस २६० सीसी- इम्रान पाशा (पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग)
क्लास ५ ः सुपर स्पोर्टसऊ ४०० सीसी - राजेश स्वामी (पेन)
क्लास ६ ः सुपर स्पोर्टस् ५५० सीसी - सुहेल अहमद (बंगळुरू)
क्लास ७ ः स्कूटर्स २१० सीसीपर्यंत- सय्यद असिफ अली (पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग)
क्लास ८ ः महिला गट- तनिका शानबाग (हीरो मोटर स्पोर्टस)
क्लास ९ ः सुपर स्टॉक ४५० सीसीपर्यंत- अर्षद मुहम्मद (चेरुथुरुथी)
क्लास ९.९ ः सुपर स्टॉक ४५० सीसीपर्यंत (गट ड)- पी. एस. ध्रुव (बंगळुरू)
क्लास १०ः स्टार ऑफ महाराष्ट्र - अमरेंद्र साठे (पुणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.