Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : डांगसौंदाणे उपबाजाराच्या जागेबाबत फसवणूक; संजय चव्हाण यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे यांनी डांगसौंदाणे उपबाजार आवारासाठी स्वमालकीची जागा नियमबाह्य पद्धतीने घेत शासनाची व बाजार समितीची फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा येत्या १४ ऑगस्टपासून सटाणा बाजार समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Sanjay Chavan allegations of fraud regarding Dangsaundane sub market location )

श्री. चव्हाण यांनी पणन विभागाचे प्रधान सचिव, पणन संचालक व जिल्हा निबंधकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार श्री. सोनवणे यांनी डांगसौंदाणे उपबाजार आवारातील स्वमालकीची २.५ एकर जागा सौ. जयश्री सचिन पाटील या त्यांच्या विवाहित मुलीच्या नावाने करून ७५००० रुपये प्रति एकर भाडे याप्रमाणे वार्षिक १ लाख ८७ हजार ५०० रुपये व दरवर्षी १० टक्के भाडेवाढ निश्चित करून नोंदणीकृत कराराने सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीस दिली आहे. बाजार समितीकडून त्यांनी तीन वर्षांसाठी ६ लाख २० हजार ६२५ रुपये अॅडव्हान्स सुद्धा घेतलेला आहे.

नव्याने प्रक्रिया राबवावी

व्यापाऱ्यांच्या भाडेपट्टा करारनामाची नियमानुसार नव्याने प्रक्रिया राबवावी. समितीने याबाबत जाहिरात, टेंडर व अर्ज अशी कायदेशीर प्रक्रिया न राबविता परस्पर भाडेपट्ट्याने बाजार समितीला जागा घेतली आहे. डांगसौंदाणे परिसरात वार्षिक २५ हजार रुपये एकरी या दराने अनेक जागा उपलब्ध असतानाही सभापती सोनवणे यांनी विवाहित मुलीच्या नावाने हा भाडेकरार करून बाजार समितीची आर्थिक फसवणूक केली आहे.

गरज नसताना जागा घेतली

डांगसौंदाणे उपबाजारात शेतमालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तरीही स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने बाजार समितीला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. संचालक मंडळाला दोनवेळा शासनाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ देताना कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊन नये अशा अटी शर्ती असतानाही सभापती सोनवणेंनी हा करार केला आहे. भाडेकरारात त्यांनी स्वमालकीच्या छत्रपती वे ब्रिज या भुईकाट्यावरच वजन करावे लागेल, अशी अट घालण्यात आलेली आहे. ही अट इतर वे ब्रिज धारकांवर अन्याय करणारी आहे.

करार रद्द करून ॲडव्हान्स परत घ्या

हा भाडेकरार त्वरित रद्द करावा. त्यांनी घेतलेल्या तीन वर्षांचा ६ लाख २० हजार रुपये ६२५ रुपये अॅडव्हान्स वसूल करावा. त्याचप्रमाणे डांगसौंदाणे उपबाजारात येणारी शेतमाल आवक व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ पाहून आवश्यक असेल तरच डांगसौंदाणे उपबाजारातील व्यापाऱ्यांना द्यावयाच्या जागेचा नियमानुसार जाहिरात व इच्छुक जागा मालकांचे अर्ज मागवून नव्याने प्रक्रिया राबवावी, अन्यथा येत्या १४ ऑगस्ट पासून सटाणा बाजार समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संजय चव्हाण यांनी दिला आहे.

''पणन महामंडळाच्या नियमांचे पालन करत सर्व अटी शर्तींची पूर्तता करूनच डांगसौंदाणे उपबाजार आवारातील माझ्या मुलीच्या नावावरील जमीन बाजार समितीला भाडे तत्त्वावर दिली आहे. त्यात कुठेही पदाचा गैरवापर केलेला नाही. माजी आमदार संजय चव्हाण यांनी केलेले सर्व आरोप खोटे व दिशाभूल करणारे आहेत. पणन मंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्या जमिनीवर बांधण्यात येणारी व्यापाऱ्यांची दुकाने बाजार समिती भाडे तत्त्वावर देईल व बाजार समितीचे उत्पन्न वाढेल. व्यक्ती द्वेषातून बदनामी केली जात असेल तर तो करार रद्द करून जमीन परत घेण्याची आमची तयारी आहे.''- संजय सोनवणे, सभापती, बाजार समिती सटाणा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : शुभम जोशी यांची श्री साई संस्थान शिर्डी येथे मुख्य प्रधान पुजारी म्हणून निवड

SCROLL FOR NEXT