Police Commissioner Sandeep Karnik came on Friday to have darshan of Sant Nivruttinath Maharaj Palkhi in Satpur.
Police Commissioner Sandeep Karnik came on Friday to have darshan of Sant Nivruttinath Maharaj Palkhi in Satpur. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : सातपूर गावातून पालखीसमवेत 47 दिंड्या; ग्रामस्थांसह पोलिसांकडून पालखीचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : त्र्यंबकेश्वर येथून गुरुवारी (ता. २०) निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी सातपूरमध्ये शुक्रवारी (ता. २१) दाखल झाली. सातपूरकर, पोलिस प्रशासनासह महापालिका, सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. या वर्षी सातपूर गावातून पालखीसमवेत ४७ दिंड्या सहभागी झाल्या. (Sant Nivruttinath Maharaj 47 dindi with palkhi from Satpur village)

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढ वारी पालखी सोहळा गुरुवारी (ता.२०) दुपारी बाराला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघाला. पहिला मुक्काम पेगलवाडी येथील निर्मोही आखाड्यात झाला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१) सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आगमन झाले. सायंकाळी साडेपाचला औद्योगिक व कामगारनगरी सातपूरमध्ये पालखी दाखल झाली.

रस्त्यावर ठिकठिकाणी कामगार व महिलांनी पालखीचे दर्शन घेतले. सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर गावात टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळा आणण्यात आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दर्शन घेतले. संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा सातपूर गाव आयोजन समिती तसेच पालखी सोहळाप्रमुख नारायण मुठाळ.

नाशिक महापालिका सातपूर विभागीय कार्यालयातील अधिकारी यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. सातपूरगाव पालखी सोहळा स्वागतप्रमुख यांच्याकडून पालखीच्या अनुषंगाने संत निवृत्तिनाथ मंदिराचे विश्‍वस्त व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. आमदार सीमा हिरे, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, माजी महापौर दशरथ पाटील, ‘आरपीआय’चे नेते प्रकाश लोंढे, दीक्षा लोंढे, सलीम शेख, महेश हिरे, मधुकर जाधव. (latest marathi news)

नंदूशेठ जाधव, सीमा निगळ, विजय भंदुरे, बाळा निगळ, रामहरी संभेराव आदींनी पालखीचे दर्शन घेतले. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोपनीयचे अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वारकरी व भक्त उपस्थित होते.

"पालखीबरोबर वारकऱ्यांसाठी २०० शौचालय, स्नानगृहची व्यवस्था केली आहे. तसेच मुख्य रस्ता चागंला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व महापालिका तसेच इतर संस्थानी सहकार्य केले आहे. चार रुग्णवाहिका, खासदार राजाभाऊ वाजे व राज्य शासनाकडून फिरता दवाखाना, औषधं इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे." - श्रीपाद कुलकर्णी, सदस्य, संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT