त्र्यंबकेश्वर : दर वर्षाप्रमाणे यंदाही संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातून आषाढी वारीसाठी गुरुवारी (ता. २०) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दुपारी दोनला समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान व पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून मार्गस्थ होणार आहे. (Sant Nivruttinath palanquin departure for Pandharpur today)
यासाठी निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, या पालखी सोहळ्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. संत श्री निवृत्तिनाथ महाराज वारकरी भजनी मंडळातर्फे दर वर्षी पालखीसमवेत असलेल्या दिंड्या व भाविकांची व्यवस्था केली जात आहे. लोकवर्गणीतून वारकरी भाविकांना विविध सेवा पुरवितात.
शासनातर्फे निर्मलवारीसाठी सव्वादोन कोटींची मंजुरी मिळून जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, फिरती प्रसाधनगृहे व दिंडी मार्गातील मुक्काम व्यवस्था यासाठी ही रक्कम खर्ची पडणार आहे. एकूणच वारी सर्वदृष्ट्या सुविधेसह हायटेक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पालखीसमवेत दिंड्या व भजन, कीर्तन करणारे दिंडीप्रमुख, भालदार व चोपदार असतात. त्यांची व्यवस्था पालखी व्यवस्था पाहणारे करतात. पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून दोन किलोमीटरवरील श्री पंचायत महानिर्वाण आखाडा, पेगलवाडी येथे मुक्कामी राहील. त्र्यंबकेश्वरचे भाविक व मंडळे या पालखीची भोजन व्यवस्था करतात. (latest marathi news)
शुक्रवारी (ता. २१) सकाळी सातला स्नान व पूजा झाल्यावर पालखी दरमजल करीत महिरावणी येथे दुपारी जेवणासाठी थांबेल. सायंकाळी सातपूर येथे मुक्कामी थांबेल. पिंपळगाव बसवंत येथील भाविक रात्रीचे जेवण देतात. शनिवारी (ता. २२) नाशिक शहरात पालखी सकाळी नऊला प्रवेश केल्यावर त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोर नाशिककर पालखीचे स्वागत करतील.
दुपारी बाराला काजीपुरा नामदेव विठ्ठल मंदिरात व तेथून गणेशवाडी, नवीन भाजी मार्केट येथे मुक्कामी थांबेल. रविवारी (ता. २३) सकाळी अकराला नाशिक रोड येथून सायंकाळी पळसे येथे मुक्कामी पोचेल. तेथून खंबाळे, पारेगाव, गोगलगाय, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगराळ व अहमदनगर येथे ३ जुलैला निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा सकाळी दहा ते बारापर्यंत होईल.
तेथून मुक्कामी साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंबर, दगडीअकोले, करकंब, पांढरीचीवाडी, चिंचोली व पंढरपूर असा मुक्काम करीत पोचणार आहे. यात २५ जूनला सिन्नरलगतच्या दातली येथे व १६ जुलैला वाखरी येथे रिंगण सोहळा होईल. १७ ते २० जुलैला पंढरपूरला पालखीचा मुक्काम निवृत्तीनाथ मठ पंढरपूरला व नंतर पालखी माघारी निघेल.
राज ठाकरे यांची उपस्थिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सहपरिवार या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहणार असून, ते त्र्यंबकेश्वर येथे दुपारी एकला पपोचणार आहेत. स्थानिक मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर ठाकरे पालखी सोहळ्यात सहभागी होऊन त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन व अभिषेक पूजा करणार असल्याचे भूषण भुतडा यांनी सांगितले.
पालखी १७ जुलैला पंढरपुरात
उत्तर महाराष्ट्रातील ४२ दिंड्या निवृत्तिनाथ पालखीसमवेत, तर पालखी पुढे नेहमीच्या मानाच्या चार दिंड्या अशा ४६ अधिकृत व लहान-मोठ्या दिंड्या रस्त्याने जाताना गावोगावी एकत्र येत भाविकांची संख्या एक लाखावरून अधिक होत जाते. २० जूनला त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी १७ जुलैला पंढरपूरला पोचेल.
वाटेत पंचवीस ठिकाणी पालखी मुक्कामी थांबते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावचे व परिसरातील ग्रामस्थ पालखीची भोजन व्यवस्था तसेच निवास, अल्पोपाहार, चहापानाची व्यवस्था करतात. पालखीसमवेत पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक असते. या कालावधीत त्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.