Chief Minister Eknath Shinde took darshan of Sant Nivruttinath Maharaj. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : मुख्यमंत्र्यांनी घेतली दिंडीकऱ्यांची भेट!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काजीपुऱ्यातील नामदेव विठ्ठल मंदिर येथील दर्शनानंतर पालखी दिंडी गणेशवाडीतील महापालिका शाळेच्या प्रांगणात पोचली. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धावती भेट घेत आरती सोहळ्यातही उपस्थिती नोंदविली. या वेळी मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी दिंडीकऱ्यांची गर्दी उसळली होती. (Chief Minister eknath shinde met Dindikar)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रपुष्पांजली झाली. संत निवृत्तिनाथ संस्थानच्या अध्यक्ष कांचन जगताप यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. पालकमंत्री दादा भुसे, अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडी सोहळ्याच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याची माहिती वारकऱ्यांना दुपारीच समजली.

त्यामुळे वारकऱ्यांत मोठ्या उत्साह होता. अनेक जण मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पोलिस बंदोबस्तामुळे अनेकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी धावत्या भेटीतही अनेकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. गाडीत बसल्यावर मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

मुख्यमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर सकाळच्या काही घटनांमुळे अगोदरच धास्तावलेल्या सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडला. आंदोलकांच्या धास्तीने जुन्या आडगाव नाक्यापासून गणेशवाडीपर्यंत मोठा पोलिस बंदोबस्त होता. (latest marathi news)

रिपब्लिकन पक्ष, भाकपचे निवेदन

मुख्यमंत्र्यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास गणेशवाडी महापालिका शाळेतील मुक्कामी दिंडीकऱ्यांची धावती भेट घेतली. या भेटीच्यावेळी पंचवटीतील जातीय सलोखा व शहराची शांतता बिघडविणाऱ्या शक्तींवर वेळीच कारवाई करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) निवेदन देण्यात आले.

निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही पाठविण्यात आल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, ॲड. प्रशांत जाधव यांनी सांगितले. शहरातील काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटना समाजात द्वेष निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला.

याबाबत मुख्यमंत्र्यांच्या गणेशवाडीतील दिंडी सोहळ्याच्या भेटीवेळी पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी केली. पक्षाच्या शहर कमिटीचे सदस्य सचिन मालेगावकर, सचिव मंडळ सदस्य दिनेश सातभाई, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT