Satpur Villagers take darshan of Sant Nivruttinath Maharaj.
Satpur Villagers take darshan of Sant Nivruttinath Maharaj. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचे पंचायत समितीजवळ स्वागत!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २२) सकाळी त्र्यंबक रोडवरील पंचायत समितीजवळ आगमन होत आहे. याठिकाणी स्वागत समितीतर्फे दिंडीप्रमुख, टाळकरी, विणेकरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, दिंडीचा शनिवारचा (ता. २२) मुक्काम गणेशवाडी येथील महापालिका शाळेच्या आवारात राहणार आहे. (Sant Nivruttinath Palkhi Welcome to Panchayat Samiti)

सकाळी सातच्या सुमारास पालखी सातपूरहून नाशिककडे प्रस्थान ठेवेल. नऊच्या सुमारास त्र्यंबक रोडवरील पंचयात समितीच्या प्रांगणात सोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात येईल, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष पदमाकर पाटील, उपाध्यक्ष माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड, सचिव सचिन डोंगरे यांनी दिली. स्वागताच्या तयारीसाठी रत्नाकर चुंभळे, रमेश कडलग, माणिकराव देशमुख, नरेंद्र उगलमुगले, ॲड. भरत ठाकरे, कैलास सोनवणे आदी प्रयत्नशील आहेत.

मुक्काम गणेशवाडीत

पालखी व दिंड्यांचे सकाळी शहरात आगमन झाल्यावर पंचायत समितीच्या आवारात दिंडीकऱ्यांचे पारंपरिक पद्धीने स्वागत करण्यात येईल. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीकऱ्यांचा सत्कार होईल. (latest marathi news)

त्यानंतर नाश्‍ता झाल्यावर जुन्या नाशिकमधील काजीपुऱ्यातील संत नामदेव विठ्ठल मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल. याठिकाणी पूजाविधी व दुपारचे जेवण झाल्यावर सायंकाळी पालखी गणेशवाडीतील महापालिका शाळेच्या आवारात येईल. याठिकाणी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यातर्फे सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी (ता. २३) पालखी नाशिक रोडकडे मार्गस्थ होईल.

शंखवादनाने वाढणार रंगत

पालखीच्या स्वागतासाठी वाकडी बारव ते संत नामदेव विठ्ठल मंदिरादरम्यान शंखवादन करण्यात येणार आहे. प्रथमच होत असलेल्या या शंखवदानाबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. महिलांसह पुरुष शंखवादक यात सहभाग नोंदवतील, अशी माहिती पथकप्रमुख वृषाली राघव घोलप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT