Buddhism esakal
नाशिक

Buddhism : बौद्ध धम्मातील ‘वर्षावास पर्व’

सकाळ वृत्तसेवा

वर्षावासानिमित्त अनेक बुद्धविहारांमध्ये ‘धम्मपद’ या ग्रंथाचे वाचन आणि निरूपण होत आहे. धम्म म्हणजे धार्मिक आणि पद म्हणजे कवितेच्या ओळी, यावरून धम्मपद म्हणजे धार्मिक पद्यरचना किंवा काव्यात्मक उपदेश होय. त्रिपिटक या बौद्ध वाङ्‍मयातील ‘धम्मपद’ हा सर्वांत लोकप्रिय ग्रंथ आहे.

सुत्तपिटकाच्या खुद्दकनिकायातील पंधरा भागांपैकी दुसरे प्रकरण धम्मपद आहे. धम्मपदाच्या व्यतिरिक्त दस पारमिता, निब्बान, नाम रूप, कर्म सिद्धांत, सप्त बोध्यांग, प्रतित्य समूत्पाद आणि विपश्‍यना इत्यादी विषय आहेत. तूर्तास ‘वर्षावास पर्व’ ही मालिका आता समाप्त करीत आहोत. ‘सकाळ’चे मनःपूर्वक आभार. वाचकांच्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. (Varshavas Parva in Buddhism)

बौद्ध धम्माचा इतिहास असं सांगतो, की सिद्धार्थ गौतमाला एकही गुरू सिद्ध झाला नाही, म्हणून त्यांनी ठरवलं, की जे काही साध्य करायचं आहे त्यासाठी स्वतःच तपश्चर्या केली पाहिजे. तथागत बुद्धांच्या उपदेशात जो विश्वास आहे, त्याचं कारण हेच आहे, की त्यांनी ते स्वतः शोधलं. कुणा गुरूकडून प्राप्त केलं नाही की कुणाचं अनुकरण केलं नाही. ‘अत्त दीप भव’ (तूच स्वतःचा दीप हो) या अनुभूतीतूनच सम्यकसम्बोधि प्राप्त केली.

तथागत बुद्धांनी पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात गरीब-श्रीमंत, मालक-नोकर, राजा-रंक, सज्जन-दुर्जन, दास-दासी, व्यापारी, दरोडेखोर, गणिका, अशा सर्व स्तरांतील लोकांना भेटून त्यांचे दुःख जाणून घेतले. राजे-महाराजे, भिक्खू-भिक्खूंनी, उपासक-उपासिका आणि इतर परिव्राज्यकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे म्हणजे ‘धम्मपद’ होय. म्हणून धम्मपद हे प्रश्नोत्तरित आहे.

मूळ प्रश्न काय आहे?, तो कोणी विचारला? कोणत्या ठिकाणी विचारला?, या अनुषंगाने धम्मपदाचे संकलन करण्यात आलेले आहे. धम्मपद हा दोन, चार आणि सहा ओळींच्या पदांचा ग्रंथ असून, त्यातील बरीचशी पदे ही सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून उपदेशिलेली आहेत. धम्मपदाचे लेखन हे इ.स.पूर्व पहिल्या शतकात झालेले असले तरी यातील बहुतांश पदे ही मूळ सुत्तपिटकाच्या पहिल्या चार निकायात अगोदर आलेली आहेत. त्यावरून ही सर्व पदे प्रत्यक्ष बुद्धांनीच उपदेशिलेली आहेत, हे सिद्ध होते.

धम्मपदात एकूण ४२३ पदे आहेत, या पदांची रचना प्रश्नांच्या स्वरूपानुसार २६ प्रकारच्या वर्गामध्ये केलेली आहे. पालीभाषेत त्याला ‘वग्ग’ म्हणतात. धम्मपदे ही बऱ्याचअंशी अनुष्टुभ, त्रिष्टुभ आणि जगति वृत्तात आहेत. व्याकरणातील गण, वृत्त, मात्रा, छंद, यमक, अन्त्ययमक व निरुक्ती यांचा तंत्रशुद्ध प्रयोग सर्वप्रथम बुद्धांनी केला, हे विशेष.

कारण व्यंजन, छंद, यमक इत्यादी शब्द तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी धम्मपदात वापरलेले आहेत. धम्मपदाच्या अभ्यासासाठी धम्मपदअट्ठकथा (घटनेवर आधारित कथा) फार महत्त्वाच्या आहेत. ४२३ धम्मपदांवर ३०५ कथा सांगितलेल्या असून, त्या इ.स.नंतरच्या पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेल्या आहेत.

नंतरच्या काळात धम्मपदावर भन्ते राहुल सांकृत्यायन, भन्ते आनंद कौसल्यायन, धम्मानंद कोसंबी, भिक्खू धर्मरक्षित, आचार्य विनोबा भावे, आचार्य रजनीश, पी. व्ही. बापट, राजा ढाले आदी विद्वानांनी लेखन केलेले आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ धम्मपदातील अनेक महत्त्वपूर्ण संदर्भांनी समृद्ध झालेला आहे.

धम्मपद या ग्रंथाला जागतिकस्तरावर मान्यता मिळालेली आहे. कारण यातील उपदेश हा नैतिकतेने परिपूर्ण असून, अतिशय साध्या-सोप्या, रसाळ आणि प्रासादिक भाषेत वर्णिलेला आहे. यातील उपमा अतिशय समर्पक आणि बोधप्रद आहेत. सव्वीसशे वर्षांपूर्वी उपदेशिलेल्या धम्मपदांचा आणि दोन हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या अट्ठकथांचा अभ्यास करून तो एकविसाव्या शतकातील विज्ञाननिष्ठ दृष्टीशी सुसंगतपणे मांडणे, हे आजच्या धम्म अभ्यासकांचे काम आहे.

(लेखक हे पाली भाषेचे अध्यापक असून, बौद्ध धम्माचे व्यासंगी अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Live Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

IPL 2025 Auction Explainer: नवा सिजन, नवे नियम... खेळाडूंचं रिटेंशन, RTM कार्डचा वापर अन् १२० कोटींची किंमत; समजून घ्या सर्वकाही

Uddhav Thackeray: महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT