Water supply by tankers due to permanent shortage. The second photo shows women waiting for a tanker esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : वर्षभर 4 गावांना टॅंकर, इतरांचीही संख्या वाढतेय

Nashik News : तालुक्यात गतवर्षी सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश पाणी योजनांच्या उद्भव विहिरींनी तळ गाठला आहे.

अंबादास देवरे

सटाणा : तालुक्यात गतवर्षी सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश पाणी योजनांच्या उद्भव विहिरींनी तळ गाठला आहे. आरम व हत्ती या दोन्ही नद्यांच्या दुथडी असलेल्या गावांमध्ये फेब्रुवारी- मार्च महिन्यातच टंचाई निर्माण झाली. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा कराव्या लागणाऱ्या सटाणा शहरवासीयांना नव्याने निर्माण झालेल्या पुनंद धरण पाणी योजनेमुळे दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. (Satana taluka due to low rainfall everywhere water scarcity)

मोसम किनाऱ्यालगतच्या काटवन- नामपूर खोऱ्यातील पाणी योजनांचे स्त्रोत हरणबारी धरणाच्या आवर्तनावर तर आरम नदी किनारी असलेल्या योजनांचे स्त्रोत केळझर धरणाच्या आवर्तनावर चार्ज होतात. सध्या बागलाण तालुक्यातील २४ गावे वाड्या वस्त्यांवर २३ टँकरद्वारे दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. ४४ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

दोधनपाडा, औंदाणेपाडा, वाडी चौ ल्हेर, वघाणेपाडा या चार गावांना वर्षभर टॅंकरने कायम पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने २४ खासगी विहिरी अधिगृहीत केल्या असून दररोज २४ ट्रॅक्टर द्वारा ३७ फेऱ्या केल्या जातात. तळवाडे भामेर, (गोमदरपाडा), तिळवण (सरवर), गोराणे, ब्राह्मणपाडे या चार गावांचे नव्याने टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी नुकतेच दाखल झाले आहेत.

विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाणीपातळी मर्यादेपेक्षा खोल गेली आहे. दीड दोन महिन्यांचे उन्हाळी कांदा पीक पाण्याअभावी अपरिपक्व स्थितीत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. उन्हाच्या झळा वाढल्याने तालुक्यातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या उद्धव विहिरी कोरड्या झाल्याने काही गावांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. (latest marathi news)

पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. आठशे ते हजार रुपये दराने टँकर विकत घेणे भाग पडत आहे. मोसम खोऱ्याच्या मध्यवर्ती व प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या नामपूर शहरात झपाट्याने होणाऱ्या सोईसुविधांच्या उपलब्धतेमुळे नळकेस, सारदे व मालेगाव- साक्री रस्त्यालगत दुतर्फा नववसाहती तयार होत आहेत.

शहराची लोकसंख्या पस्तीस हजारावर गेली. मोसम नदीकिनारी असूनही नामपूरचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. नुकतीच नामपूरसह पाच गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी थेट हरणबारी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणणारी महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण झाली असली तरी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे योजनेचे पाणी घराघरात कधी पोहोचणार याबाबतचे प्रश्नचिन्ह आजही कायम आहे.

खासगी विहिर अधिग्रहीत गावे

(कंसात विहिरींची संख्या)

नळकस ः (१), नामपूर ः (१०), ठेंगोडा ः (२), भाक्षी ः (सटाणा येथील १ ), आसखेडा (२), द्याने ः (१), मळगाव (ति.) ः(१), आराई ः (३), औंदाणे ः(१), तळवाडे भामेर ः (१), बिजोरसे ः (२), मोराणे सांडस ः (१), सोमपूर ः (१), देवपूर ः (१), वाघळे ः (२), कातरवेल ः(१), विसापूर ः (२), दगडपाडा ः (१), खैरड ः (१), ब्रिंदावणपाडा ः (२), मुंजवाड ः (१), तुंगणदिगर ः (१), वनोली ः (१), अजंदे ः (१), दसवेल ः (१), आव्हाटी ः (१), जायखेडा ः (१). ः एकूण ४४

तालुक्याची सद्यस्थिती

- अधिग्रहित खासगी विहीरी ः ४४

- एकूण चालू हातपंपांची संख्या- १२३

- पाझर तलाव- ४० (११३२.८० स घमी)

- साठवण बंधारे- ३८२ ( २०८१८.२४ स घ मी)

- कोल्हापूर बंधारे -८७ (२४६३.८४सघमी)

- नद्या - २

- धरणे - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT