Educational Institutions esakal
नाशिक

Educational Institutions : शिक्षणसंस्थांचे 29 जूनला राज्यभर शाळाबंद आंदोलन

Nashik News : पाच वर्षांपूर्वी शिक्षण संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार शाळांना वेतन आयोगानुसार अनुदान देण्यात यावे, याबाबत न्यायालयाने संस्थांच्या बाजूने निकाल दिला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पाच वर्षांपूर्वी शिक्षण संस्थांनी केलेल्या दाव्यानुसार शाळांना वेतन आयोगानुसार अनुदान देण्यात यावे, याबाबत न्यायालयाने संस्थांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही शासनाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली म्हणून संस्था चालकांनी अवमान याचिका दाखल करीत शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करीत शनिवारी (ता. २९) एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करणार. (School shut down movement of educational institutions)

असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘मविप्र’च्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी (ता. १३) झालेल्या पत्रकार परिषदेत ‘मविप्र’चे सरचिटणीस तथा महामंडळाचे विधी सल्लागार व प्रवक्ते ॲड. नितीन ठाकरे, ‘मविप्र’चे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की शासनाद्वारे कोणतीही नोकरभरती, शिक्षक भरती करताना पात्रतेबरोबर पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. पण, गेल्या १० वर्षांचा व त्यापूर्वीचा इतिहास पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिली नाही. यंदा ‘नीट’च्या बाबतीत तोच प्रसंग ओढवला. त्यामुळे परीक्षा पोर्टलमध्ये फेरबदल करण्याची गरज आहे.

देशाच्या अनेक राज्यांत परीक्षेमधील घोटाळा नेहमीचा झाला. परीक्षा घोटाळ्यात एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासह वरिष्ठ अधिकारी सात वर्षे जेलची हवा खाऊन आले. आपल्या राज्यातील तत्कालीन ‘एमपीएससी’च्या अध्याक्षांनाही तुरुंगवास भोगावा लागला. आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. (latest marathi news)

ॲड. ठाकरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये शिपाईपद रद्द करण्यात आले आहे. शाळांमध्ये अनेक छोटी-मोठी कामे असतात. शिपायाशिवाय शाळा चालविणे अवघड आहे. शासनाने शिक्षण संस्थांना प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत महिला व पुरुष शिपाई म्हणून अनुदानित तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय घ्यावा. ५० ते ६० वर्षे जुन्या शाळा- महाविद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्तीसाठी शासनाने निधीची तरतूद करून द्यावी. तसे न झाल्यास ग्रामीण भागातील शाळा बंद पडतील.

प्रमुख मागण्या अशा...

- भरती पोर्टलमधील सुधारणेसाठी समिती नेमून त्यात संस्थाचालकांना सहभागी करून घ्यावे.

- माध्यमिक विद्यालयासाठी १० किलो वॉट व महाविद्यालयासाठी २५ किलो वॉटचे सोलर ऊर्जा संयंत्र शासन खर्चाने बसवावे.

- ग्रामीण भागातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या शिक्षकांना वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा आग्रह धरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT