Nashik News : इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार अकरावीत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ३) ते रविवार (ता. १०)दरम्यान अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदविता येतील. यानंतर १० जुलैला विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Second list of Junior College Admission on July 10)
नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठी पहिल्या नियमित फेरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा तीन नियमित फेऱ्यांचे आयोजन केले जाईल.
दरम्यान, पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला असून, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत प्रवेशित विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जातो. पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच शिक्षण विभागाने दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पहिल्या फेरीत प्रवेशाची उद्यापर्यंत मुदत
यापूर्वी गेल्या गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या फेरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी सोमवार (ता. १) पर्यंत मुदत आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी चारपर्यंत चार हजार १४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. (latest marathi news)
त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेशित विद्यार्थी संख्या पाच ते सहा हजारांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. विविध कोट्यांतर्गत साडेचार हजारांहून अधिक जागा उपलब्ध असताना, त्यासाठी केवळ ८०० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे कोट्याच्या रिक्त जागांची संख्याही लक्षणीय आहे.
दुसऱ्या नियमित फेरीचे असे आहे वेळापत्रक ः
अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत- ३ ते ६ जुलै
दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी- १० जुलै स. १०
यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत- १० ते १२ जुलै
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.