While congratulating Sejal Sinkar, senior teacher of Mahatma Vidyalaya, Pramod Yeole, teacher brother's, Chitra Sinkar and Anil Sinkar. esakal
नाशिक

Inspirational Story : ‘तिच्या’ चौरंगी यशाने सारेच अचंबित! शैक्षणिक भरारी

Nashik News : आई-वडिलांना कौटुंबिक कामात मदत करीत मनमाड शहरातून मराठी माध्यमातून बारावी विज्ञान शाखेत चौरंगी यश सेजल अनिल सिनकर या विद्यार्थिनीने प्राप्त केले आहे.

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आई-वडिलांना कौटुंबिक कामात मदत करीत मनमाड शहरातून मराठी माध्यमातून बारावी विज्ञान शाखेत चौरंगी यश सेजल अनिल सिनकर या विद्यार्थिनीने प्राप्त केले आहे. सेजल हिची तब्बल चार टप्प्यांतील शैक्षणिक यशोगाथा सध्या मनमाड व परिसरात कौतुकास्पद विषय ठरली आहे. (Sejal Anil Sinkar student from Manmad city has achieved success in Class XII)

सेजलने बारावी बोर्ड परीक्षेत गणितात १००, भौतिकशास्त्र (९७), रसायनशास्त्र (९४), जीवशास्त्रात ९५ गुण याप्रमाणे तब्बल ९५ टक्के मिळवून नांदगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, सीइटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधून ९९.३७ पर्सेंटाइल आणि पीसीबी ग्रुपमधून ९८.८२ पर्सेंटाइल, तर जेईई मेन्स २०२४ परीक्षेत ९० पर्सेंटाईल मिळवत देदीप्यमान यश मिळवले.

विशेष बाब म्हणजे मनमाड शहरातून पहिली ते बारावीपर्यंत तिने स्टेट बोर्डातून यशस्वी वाटचाल केली आहे. बालवाडीपासून नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयात असताना पाचवीत शिष्यवृत्तीत नांदगाव तालुक्यात प्रथम क्रमांक आणि आठवीपासून छत्रे माध्यमिक विद्यालयात दहावीला ९६.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. या वर्षी मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयातून बारावीत यश मिळवले.

सेजलला एक गुणवंत अष्टपैलू विद्यार्थीनी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. लहानपणापासून नाणी व नोटा संग्राहक म्हणून छोटेखानी प्रदर्शनातून शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. येवला तालुक्यातील कातरणी शिवभारत व्याख्यानात २५ एप्रिल २०१७ ला प्रदर्शन भरविले होते. (latest mrathi news)

तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक असलेले वडील अनिल तुकाराम सिनकर यांच्या प्रत्येक नवोपक्रमात तिचा सहभाग होता. शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत स्वयंसेवक सहभाग प्रमाणपत्र फ्रेमिंग करून दिले आहेत. केंद्रप्रमुख संतोष लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील पाटोदा, कानडी, विसापूर शाळेत तिने प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वाटप केली आहेत.

कोरोनात आपत्कालीन परिस्थितीनंतर ऑनलाइन पीडीएफ फाइल रूपातील सरावपाठ निर्माण करण्यात वडिलांना तिने मदत केली. त्यामुळेच ३ जानेवारी २०२१ ला महिला शिक्षणदिनी पाटोदा केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विद्यार्थीनी स्वयंसेवक म्हणून सेजलला सन्मानित करण्यात आले होते. प्रत्ययकारी शब्दकोश (भाग पहिला) या पुस्तकाची सहाय्यक लेखिका म्हणून वडिलांना मदत केली.

२४ डिसेंबर २०२० ते ११ जून २०२१ या कोरोनाकालीन आपत्कालीन परिस्थितीत ‘श्यामची आई’ पुस्तकातील कथानकावरून तब्बल २९४ व्हिडिओ मालिकेची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉडर्स’मध्ये राष्ट्रीय नोंद करण्यात आली आहे. लहानपणापासून चित्रकला, लेखन, वक्तृत्व स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

Fact Check : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्याची 'ती' ऑडिओ क्लिप खोटी

BMC Property Tax: प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त, ६०० कोटींची थकबाकी वसूल करणार

Mohol Crime: मोहोळमध्ये ईव्हीएम हॅक करणाच्या प्रकार? 14 मोबाईलसह दोन बिहारी तरुण पोलिसांच्या ताब्यात, गुप्तचर विभाग लागला कामाला

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT