one state one challan esakal
नाशिक

Nashik: ‘एक राज्य, एक चलान’ कारवाईच्या पायलट प्रोजेक्टसाठी नाशिकची निवड! गृहविभागाकडून 57 लाखांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देशभरात सातत्याने रस्ता अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यातही महाराष्ट्रात घडणाऱ्या अपघाती घटना गंभीर असून, राज्यातील सर्वाधिक अपघातांमध्ये नाशिकचा समावेश आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईसाठी ‘एक राज्य एक चलान’ या धोरणांतर्गत ‘नॅशनल इन्फोमेटिक्स सेंटर’ (एनआयसी) इ-चलान कारवाईसाठीचा पायलट प्रोजेक्ट करण्याकरिता नाशिकची निवड करण्यात आलेली आहे.

यासाठी गृह विभागामार्फत५७ लाखांचा प्रशासकीय निधीला मंजुरी देण्यात आली आहे. (Nashik selected for pilot project of Ek Rajya Ek Chalan action 57 lakhs sanctioned by Home Department nashik)

दिवसेंदिवस वाढते अपघात आणि अपघाती मृत्यू ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. अपघात आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न केले जातात. परंतु तरीही यात घट होण्याऐवजी लक्षणीय वाढ होते आहे.

त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करतानाच, अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना व त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने बेशिस्त वाहनचालकांवर प्रभावीपणे, पारदर्शकपणे कारवाई करण्यासाठी राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाची सुरवात करण्यासाठी प्रयत्न होत होते. दरम्यान, खासगी कंपनीमार्फत इ चलान कारवाई केली जात असली तरी शासकीय कंपनीमार्फत ही कारवाई सुरु करण्यासाठी प्रयत्न केले गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार, गृह विभागाने मागील बैठकांचा आढावा घेत प्रकल्प सुरु करण्यासाठी ५७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरु होणार असून त्यानंतर राज्यभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

"‘एक राज्य एक चलान’ या धोरणांतर्गत राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू केला जात आहे. त्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. त्यानंतर राज्यभरात एनआयसी ई-चलानमार्फत कारवाईची अंमलबजावणी केली जाईल."

- डॉ. रवींद्र सिंगल, अपर पोलिस महासंचालक, वाहतूक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT