RTE admission sakal
नाशिक

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 428 शाळांमध्ये 4807 विद्यार्थ्यांची निवड

RTE Admission : पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर जाऊन आपला नंबर लागला की नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशासाठी आजपासून एसएमएस पाठविले जात आहेत. मात्र, पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर जाऊन आपला नंबर लागला की नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४२८ शाळांमध्ये चार हजार ८०७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. ()

यावर्षी शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला पालकांनी आव्हान दिल्यावर न्यायालयाने शासनाचा हा निर्णय स्थगित केला असल्याने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या बदलामुळे पालकांचे समाधान झाले असून, प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला आहे.

जिल्ह्यातील ४२८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाच हजार २७१ जागांवर प्रवेश दिला जाईल. यासाठी जिल्ह्यातून १४ हजार ७८६ अर्ज दाखल झाले आहेत. यातून पहिल्या टप्प्यात चार हजार ८०७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. अगोदरच प्रवेशप्रक्रिया लांबल्याने आता वेळेत प्रवेश पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत आपली कागदपत्रे पडताळणी समितीमार्फत तपासणी करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे.

ऑनलाइन नंबर लागलेल्या पालकांना सोमवारी (ता. २२) एसएमएस पाठविले आहेत. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला फॉर्मवरील अर्ज क्रमांक टाकून आपला नंबर लागला की नाही, हे तपासून घ्यावे. ज्या पालकांचे ऑनलाइन नंबर लागले आहेत, त्यांनी २३ ते ३१ जुलैपर्यंत आपली कागदपत्रे पडताळणी समितीकडे जमा करावीत व तपासणी झाल्यावर आपले ॲडमिट कार्ड घेऊन जावे, असे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी सांगितले. (latest marathi news)

येवल्यात २६ शाळांत प्रवेश

येवला तालुक्यातील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल- अंदरसूल, स्वामी मुक्तानंद इंग्लिश मीडियम स्कूल- येवला, जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल- नगरसूल, जीवन अमृत इंग्लिश मीडियम स्कूल- मुखेड, आर्यनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल- पारेगाव, अभिनव बालविकास मंदिर- येवला, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल- येवला, आत्मा मालिक गुरुकुल- पुरणगाव, कांचन सुधा अॅकॅडमी- येवला, अभिनव बालविकास मंदिर- पाटोदा, एसएनडी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल- बाभुळगाव, एसएनडी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल- बाभुळगाव.

गणाधीश इंटरनॅशनल स्कूल- राजापूर, श्री साईनाथ इंग्लिश मीडियम स्कूल- धुळगाव, बनकर-पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल- अंगणगाव, लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल- विखरणी, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल- अंदरसूल, राजेश कदम इंग्लिश मीडियम स्कूल- जळगाव नेऊर, संतोष इंग्लिश मीडियम स्कूल- रहाडी, मातोश्री इंटरनॅशनल स्कूल- धानोरे, साईग्रीन इंग्लिश मीडियम स्कूल- नगरसूल, कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- धानोरे, संतोष इंग्लिश मीडियम स्कूल- जळगाव नेऊर, साईसिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल- पारेगाव, होरायझन अॅकॅडमी- आडगाव चोथवा व सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल- उंदीरवाड़ी या शाळांत प्रवेश दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT