women filling water from well with a battery light in the dark of night. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : हंडाभर पाण्यासाठी महिलांची दिवस-रात्री वणवण; पेठ तालुक्यातील चिखली गावात भीषण पाणीटंचाई

Nashik News : पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा अंतर्गत येत असलेल्या चिखली या गावात सुमारे ४०० ते ५०० लोकसंख्या असून गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा,

पेठ : तालुक्यातील चिखली गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र वणवण करावी लागत आहे. यातच पाण्यासाठी विहीरीवर रांग लावत रात्री मोबाईल अथवा बॅटरीच्या उजेडात रात्री पाणी भरण्याची वेळ या गावातील महिलांवर आली आहे. पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा (सुरगाणे) अंतर्गत येत असलेल्या चिखली या गावात सुमारे ४०० ते ५०० लोकसंख्या असून गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. (Severe water shortage in Chikhali village of Peth taluka)

गावात अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याचा एकही टँकर चालू केला नसल्यामुळे गावातील महिला, पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र रानोमळे भटकंती करावी लागत आहे. चिखली गावाच्या बाजूला ग्रामपंचायतच्या दोन विहिरी असल्यातरी त्या मार्च महिन्यापासून कोरड्याठाक पडल्या आहेत. एका विहिरीत छोटासा झरा असून त्या झऱ्‍यामुळे एक हंडा भरण्यासाठी तब्बल १५ मिनिटे लागतात. त्यामुळे तासन्‌तास महिलांना विहीरीवर नंबर येण्याची वाट पहावी लागते.

काही महिला, पुरुष गावाशेजारी सुमारे एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या नदीत खोदलेल्या खड्ड्‌यातून दगड गोट्यातून वाट काढत दरड चढत उतरत डोक्यावर हंड्यावर हंडा ठेवून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसत असलेल्या चिखली गावात ग्रामपंचायतीने प्रशासनास तत्काळ प्रस्ताव सादर करत गावात लवकरात लवकर पाण्याचा टँकर सुरु करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक गाडर यांनी केली.

"गावात मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी आम्हाला रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे गावात लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा." - आंबीबाई भवर, स्थानिक रहिवासी (latest marathi news)

"आम्हाला पिण्याचे पाणीच नसल्यामुळे विहीरीवर रात्री, बेरात्री बॅटरीच्या उजेडाच्या साहाय्याने एकएक हंडा पाणी टिपत असतो. पाण्यासाठी रोजगार बुडतो तर रोजगार अभावी उपाशी दिवस काढावे लागतात. पाण्यामुळे एक दिवसाआड कामाला जाते." - यमुना हाडळ, स्थानिक रहिवासी

"सुरगाणे, उंबरपाडा ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणारे चिखली या गावी पाणीटंचाई असून टँकर सुरु करण्यासंदर्भात पंचायत समितीला मागणी आली असून कार्यालयाने ८ मे रोजी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात चिखलीत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल." - जगन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT