Sandeep Gulve, Sharad Pawar  esakal
नाशिक

Nashik Teachers Constituency : महाआघाडीच्या संदीप गुळवेंसाठी शरद पवार सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत शरद पवार सर्व समर्थक जोमाने कामाला लागल्याचे चित्र गेल्या आठवड्यापासून विभागातील सर्वच तालुक्यांत दिसत आहे. (Nashik Teachers Constituency)

पन्नास वर्षांच्या राज्यातील राजकारणात शरद पवार हे महत्त्वाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक विभागात त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व अभ्यास हा वेळोवेळी त्याची साक्ष देत आला आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी त्यांनी जुनी-नवी मोट बांधून पाचही जिल्ह्यांत राजकीय प्रवासातील समर्थकांना पुन्हा दिलेली ताकद पाहता गुळवे यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरणार आहे.

संदीप गुळवे यांचे वडील गोपाळराव गुळवे यांचे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे स्थान होते. शिवाय, त्यांचा शरद पवार यांच्याशी असलेला स्नेह आजही दोन्ही परिवारांनी तितकाच दृढ ठेवला आहे.

त्यामुळे गुळवे यांच्यासाठी शिक्षण संस्था व शिक्षक नेत्यांची जुनी-नवी मोट बांधायला शरद पवारांनी स्वतः मैदानात पाऊल ठेवल्याने विरोधकांसाठी ही बाब काळजी वाढवणारी ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. यापूर्वी अग्रगण्य मराठा विद्याप्रसारक संस्थेसह इतर संस्थांनीही संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला होता. (latest marathi news)

राज्यातील जागावाटपात मूळ काँग्रेसचे असलेले संदीप गुळवे यांना महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश देऊन नाशिक विभागाची उमेदवारी घोषित झाली. त्याचे सर्वच घटक पक्षांनी स्वागत केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघावर गुळवेंच्या रूपाने भगवा फडकेल, असा विश्वास देत जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.

आता शरद पवार यांनी या महत्त्वाच्या मतदारसंघात विशेष लक्ष दिल्याने त्यांनी लोकसभेची एकजूट आता शिक्षक मतदारसंघात दिसली पाहिजे, असा संदेश दिल्याने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा एकसंघपणा दिसून आला आहे.

"काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी त्यांचे पुत्र संदीप गुळवे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करीत आहेत. आज गोपाळराव हयात नसले, तरी संदीप यांनी तोच जिव्हाळा कायम राखला आहे. त्यांच्या प्रचारात सर्व जण झोकून काम करीत आहेत. मला खात्री आहे, की पाचही जिल्ह्यांत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न गुळवे हे त्यांच्यातील अभ्यासूवृत्तीने सभागृहात मांडून मार्गी लावतील." - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT