Share Trading Fraud esakal
नाशिक

Nashik Share Trading Fraud : शेअर ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; 77 लाखांचा गंडा

Share Trading Fraud : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन सायबर टोळीने आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन सायबर टोळीने आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे. असे असताना आता शहरातील खुटवडनगर परिसरातील दोघांनी शहरातील १८ जणांना असेच आमिष दाखवून तब्बल ७७ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयित बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे. (Fraud by offering excessive returns from share trading 77 lakhs)

गेल्याच आठवड्यात म्हसरुळ हद्दीमध्ये दोघा संशयितांनी हॉटेलमध्ये सेमीनार घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखों रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच, अंबड पोलीस ठाण्यातही दोघांविरोधात अशाचरितीने फसवणूक केल्याची तक्रार शहर आर्थिक गुन्हेशाखेने दाखल केली आहे.

मधुकर कोळी, तेजस मधुकर कोळी (रा. रोहाऊस, कार्तिकेय नगर, खुटवडनगर, कामटवाडा शिवार) असे दोघा संशयित बापलेकांची नावे आहेत. प्रकाश मारुती पवार (रा. श्री संकुल सोसायटी, पांडवनगरी, कामटवाडे शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ मध्ये संशयितांनी शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास त्यावर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

संशयितांनी पवार यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांनीही गुंतवणूक केली. त्यावर त्यांना चांगला परतावा संशयितांनी मिळवून दिला. या माध्यमातून संशयितांनी आणखी काही गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर मिळत असलेला परतावा दाखवून त्यांचाही विश्वास संपादन केला. त्यामुळे परिसरातील सुमारे १८ जणांनी संशयितांकडे आर्थिक गुंतवणूक केली. संशयिताने त्यावर सुरवातीला चांगला परतावाही दिला.

परंतु नंतर परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांना विचारणा केली असता, संशयितांनी काहीतरी कारणे सांगून वेळ मारून नेली. परंतु नंतरही परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी संशयितांचे घर गाठले असता, ते पसार झाल्याचे आढळून आले. फिर्यादीसह १८ जणांची ७६ लाख ८५ हजार ५२० रुपयांची फसवणूक झाली आहे.

सदरचा प्रकार मार्च २०२२ ते जून २०२३ या दरम्यान घडला. याप्रकरणी पवार यांच्यासह १८ गुंतवणूकदारांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाकामी तो शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग झाला आहे. गुन्ह्याचा तपास उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत.

घरूनच व्यवहार

संशयित कोळी बापलेकांचे कार्तिकेयनगरमध्ये रो हाऊस आहे. येथूनच ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करायचे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांच्या त्यांच्या गुंतवणुकीनुसार दरमहा ८ ते १० हजार रुपये परतावा दिला. त्यामुळे आणखी गुंतवणूकदार आले. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच संशयितांनी परतावा देणे बंद केले आणि काही दिवसातच ते रातोरात पसार झाले आहेत.

यांची झाली फसवणूक

फिर्यादी प्रकाश पवार, महेश बडगुजर, संतोष दाणी, राजेश प्रजापती, राजेश साळवे, सुभाष चव्हाण, चंद्रशेखर सोनवणे, विवेक गडकरी, राहुल आव्हाड, पंकज पवार, सुमीत गायके, लिंबाजी सानेवणे, अनिता भांगरे, शंकर आव्हाड, सागर कोतवाल, रोहित रणखांबे, संजय सूर्यवंशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT