Organic chillies sent to England & other farmers inspecting a chilli plot in Shirwade. esakal
नाशिक

Nashik Mirchi Export : शिरवाडेची विषमुक्त मिरची इंग्लंडला रवाना! सेंद्रीय पद्धतीने 5 शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीतून साधली क्रांती

Latest Agriculture News : प्रचंड इच्छाशक्ती असली की, माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही चांगल्या पद्धतीने मात करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिरवाडे येथील विजय आवारे, प्रमोद आवारे, रमेश शेळके, अनिल आवारे, भूषण आवारे हे प्रयोगशील शेतकरी.

सकाळ वृत्तसेवा

मनोहर बोचरे : सकाळ वृत्तसेवा

देवगाव : शेती खर्चात बचत करत सेंद्रिय पद्दतीचा अवलंब, विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे. प्रचंड इच्छाशक्ती असली की, माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही चांगल्या पद्धतीने मात करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिरवाडे येथील विजय आवारे, प्रमोद आवारे, रमेश शेळके, अनिल आवारे, भूषण आवारे हे प्रयोगशील शेतकरी. (Shirwade poison free chilli export for England)

या शेतकऱ्यांना सिन्नर येथील कृषक मित्र ऍग्रो सर्व्हिसेस प्रा. लि. चे दत्तात्रय बनकर, सूरज खैरनार, अजय आवारे यांनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करत मिरचीची इंग्लंडची वाट सुकर करून दिली. रमेश केदू शेळके व सुरेश केदू शेळके यांनी अत्यंत क्षारपड जमिनीत उत्तम टोमॅटो, मिरची व द्राक्षे पीक घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. शेळके बंधू यांची जमीन क्षारपड. पाणीही अत्यंत खराब. जमिनीचा सामू ११ च्या वर तसाच पाण्याचाही सामू १० च्या वर, त्यामुळे कोणत्याही पिकाची वाढ होत नसे.

धामोरी येथील सेंद्रीय शेती प्रसारक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीत सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करत मिरची लागवड केली. शेणखत टाकून त्यावर खतांचा मूळ डोस म्हणून रासायनिक खते न टाकता गांडूळ खत व इतर सेंद्रीय खते टाकली. ठिबक सिंचनच्या सहाय्याने सिंचन व्यवस्था करून अल्प पाण्याचा वापर करून ते फक्त मुळाशी कसे राहील याची व्यवस्था केली.

त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन केले. पीक वाढीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून वेळोवेळी गांडूळ खत पाण्याचा वापर केला. त्यामुळे मुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली. जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे पीक बहरून आले. यातून त्यांनी सेंद्रीय शेती ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे चला असा संदेश दिला आहे. (latest marathi news)

"सुपीक जमिनीत जीवाणूंच्या सहभागापेक्षा गांडूळे जास्त महत्त्वाची असतात. मल्टिप्लायरमुळे दुसऱ्या वर्षी गांडुळे जमिनीवर येऊन खत बनवायला सुरुवात करतात. दरवर्षी एक एकर क्षेत्रात वर्षभर लागवड केलेल्या जमिनीत १२० टन गांडुळ खत बनते, त्यामुळे बाहेरून एक रुपयाचे सुद्धा खत टाकण्याची गरज नाही."- सुनील शिंदे, सेंद्रीय शेती मार्गदर्शक

"आज शेती ही पूर्णपणे रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून आहे, मात्र तिलाही सेंद्रीय शेतीची जोड दिल्यास उत्पादन खर्च निम्म्यावर येतो. आम्ही शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर केला असता फुगवण, साठवणूक क्षमता, चव व चकाकी यात आमूलाग्र बदल झाला आहे."

- रमेश शेळके, सेंद्रिय शेती पुरस्कर्ते

"शेतकऱ्यांना विषमुक्त शेती विषयक मार्गदर्शन करून सध्या एक टन मिरचीचे प्लाटून इंग्लंडच्या सुपर मार्केटसाठी रवाना करण्यात आले आहे. पुढील वर्षी सामूहिक शेतीतून १५ एकरावरील मिरची पाठविण्याचा निर्धार आहे."

- अजय आवारे, कृषक मित्र ऍग्रो सर्व्हिसेस प्रा.लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT