Amol Jadhav, Somnath Borade, Ravindra Gamane, Balkrishna Shirasat etc. esakal
नाशिक

Nashik News : शिवसेना-महायुतीमध्ये मंडप उभारणीवरून वादावादी! दोघांना एकाच मैदानावर परवानगी: अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Latest Nashik News : परवानगी मिळाल्यानंतर मंडप उभारणीवरून दुपारी चारच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : वासननगर येथील गामने मैदानावर दांडिया राससाठी शिवसेनेला (उबाठा) सिडकोच्या विभागीय कार्यालयातर्फे परवानगी मिळाली यानंतर मंगळवारी (ता. २४) महायुतीच्या सह्याद्री युवक मंडळ आणि पाथर्डी पंचक्रोशी सांस्कृतिक मंडळालादेखील राजीव गांधी भवन येथून याच मैदानावर दांडिया भरण्यासाठी परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर मंडप उभारणीवरून दुपारी चारच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले. (Shiv Sena Mahayuti dispute over mandap construction )

पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे, सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर, उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी या ठिकाणी येत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावत कुणाला नेमक्या किती आणि काय अटी- शर्तीनुसार परवानगी दिल्या आहेत, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख रवींद्र गामने यांनी सिडको कार्यालयात जागेची परवानगी घेतली आहे. त्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. दुपारी महायुतीच्या शिवसेनेचे (शिंदे) माजी नगरसेवक अमोल जाधव, भाजपचे भगवान दोंदे, राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे हे या ठिकाणी आले आणि मैदानाच्या पश्चिम बाजूकडून भाजी बाजाराकडे ५० मीटर अंतर सोडून साठ हजार चौरस फूट जागेची परवानगी आम्हाला मिळाल्याचे पत्र त्यांनी दाखवले. (latest marathi news)

सध्या सुरू असणारे काम त्याच भागात असल्याने ते थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर किरकोळ वादावादी झाली. दरम्यान, गामने यांनी निरोप दिल्याने युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, त्र्यंबक कोंबडे, मदन डेमसे, दादा मेढे, धनंजय गवळी आदींसह कार्यकर्ते येथे जमा झाले.

सध्या सुरू असलेले काम सह्याद्री मंडळाला परवानगी देण्यात आलेल्या जागेत सुरू असल्याने ते त्वरित थांबवावे, अशी विनंती जाधव आणि सहकार्यांनी पोलिसांकडे केली. पोलिस अधिकाऱ्यांनी हा वाद समजून घेत मनपा अधिकाऱ्यांना याबाबत जागेवर प्रत्यक्ष येऊन परवानगीबाबत स्पष्टता आणण्यास सांगितले आहे. दरम्यान बुधवारी (ता. २५) महापालिकेचे अधिकारी आता याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT