Uddhav Thackeray  esakal
नाशिक

Sanjay Shirsath on Uddhav Thackeray: ‘काँग्रेस अन् शरद पवारांना सोडायला उद्धव राजी नव्हते’ : संजय शिरसाट

Nashik Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु ते काँग्रेस व शरद पवार यांना सोडण्यास तयार नव्हते. त्यानंतर अजित पवार गटदेखील आमच्या सोबत आल्याचे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. (Uddhav Thackeray was not willing to leave Congress and Sharad Pawar)

महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिरसाठ नाशिकला आले होते. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनादेखील फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही फोन केला. परंतु त्यांनी ते उचलले नाहीत. नंतर देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला. नाशिकची जागा शिवसेनेने दोनदा जिंकल्याने या जागेवर आमचाच दावा होता. (Latest Marathi News)

महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला जागेवर दावा सांगण्याचा हक्क आहे. परंतु शिवसेनेचाच या जागेवर मूळ दावा आहे. सर्वपक्षीयांशी विचारविनिमय करून समंजसपणे उमेदवारीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

आम्हाला नाशिकमध्ये गद्दार उमेदवारच हवा, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. यावर शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर पलटवार करताना त्यांना मूर्ख संबोधले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकला सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT