Shiv Sena Thackeray Group Committee esakal
नाशिक

Nashik Mumbai Highway : नाशिक - मुंबई महामार्ग दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक

Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक-धुळे महामार्गाच्या दुरावस्थेमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक-धुळे महामार्गाच्या दुरावस्थेमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत असून अनेक निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागले, अनेक जायबंदी झाले. मुंबईला जातांना अक्षरश: दमछाक होते. आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. या सर्व घटनांना महामार्गाचे अधिकारीच जबाबदार असून येत्या पंधरा दिवसांत या रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती करावी, तोपर्यंत टोल नाके बंद ठेवावेत. ( shiv sena Thackeray Group meeting at National Highway Office for repair )

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने दिला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक देत महामार्गाचे अधीक्षक अभियंता व्ही.एस.साळुंखे यांना या मागणीचे निवेदन सादर केले. नाशिक-मुंबई तसेच धुळे-नाशिक महामार्गाची दुरवस्था राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच त्यांना जाब विचारण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयावर धडक मारली.

महामार्गावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. वाहतूक व्यवस्था कोलमडते. निष्पाप जीवांचा बळी जातो. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्ते विकास प्राधिकरणाने या सर्व अपघातांची जबाबदारी स्वीकारून मयतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी. जखमींवर उपचार करावेत. नवीन रस्ते विकसित करतांना मक्तेदाराचा डिफेक्ट लायबिलिटी पिरेडचा (दोष दायित्व कालावधी) विचार बांधकाम विभाग करत नाही किंवा मक्तेदाराची जबाबदारी असतांना कामात ते निष्काळजीपणा करतात.

संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी त्यावर अंकुश ठेवायला हवा. महामार्गावर अनेक उड्डाण पूल बांधले आहेत, काही पुलांचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक डायव्हर्शन व सर्व्हिसरस्ता सुरळीत नाही. रस्ता चांगला ठेवण्याची जबाबदारी मक्तेदाराची व अधिकाऱ्यांची असते. एकही ठिकाणी सर्व्हिस रस्ता वाहतुकी योग्य नाही. त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. (latest marathi news)

चिखल साचल्याने अपघात होतात. उड्डाणपुलांवर पावसाळी पाणी संकलित करून निचरा करण्यासाठी केलेली पाईपलाईन तुटल्याने पुलाखालील प्रवाशांच्या अंगावरती पाणी पडते. या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करावी आदी मागणी निवेदनात करण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात सचिन मराठे, महेश बडवे, युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपूरे, बालम शिरसाठ, वैभव ठाकरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण, महानगर संघटक देवा जाधव, समन्वयक मसुद जिलानी, उपमहानर प्रमुख सुनिल पाटील, सुनिल जाधव, नाना पाटील, सुनील निरगुडे, ऋषी वर्मा, वाहातुक सेना जिल्हाध्यक्ष विजय काळदाते आदीसह हर्षद पटेल, नितीन जाधव, सागर निकाळे, दादा मेढे, आशोक पारखे, पवन मटाले, त्रंबक कोबडे, संदिप ऐकमोडे, राजेद्र वाकसरे, राहुल पाटील आदींचा समावेश होता.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रीय महामार्ग अधिक्षक अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांच्याशी महामार्ग दुरवस्थेची चर्चा करताना खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT