Nashik News : शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या कारवर दगड टाकून नुकसान करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी संशयितांना अटक करण्याची मागणी करतानाच, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ अशा आशयाचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिले. (Nashik Shiv Sena UBT Kokne car smashed)
पंचवटीतील हनुमानवाडीत राहणारे बाळासाहेब कोकणे (रा. भावबंधन मंगल कार्यालयाजवळ) यांच्या घराबाहेर पार्क केलेली त्यांच्या कारवर बुधवारी (ता. १९) मध्यरात्री अज्ञात संशयिताने दगड टाकला. यात कारची काच फुटूली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात कोकणे यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. २०) खासदार राजाभाऊ वाजे, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंमंडळाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत चर्चा केली आणि निवेदन दिले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. ठाकरे गटाचे मध्य विधान सभाप्रमुख बाळासाहेब कोकणे यांच्या कारवर अज्ञातांनी दगड टाकून फोडण्यात आली. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. दोन वर्षांपूर्वीही कोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातून ते बालंबाल बचावले होते.
पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करून कडक शासन करावे. तसे न झाल्यास आपल्या स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला. दरम्यान या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून हल्लेखोरावर कारवाईचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, सहसंपर्कप्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंतराव गिते, उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, युवासेना राज्य सह सचिव शंभू बागुल, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, संजय चव्हाण, महानगर संघटक सचिन बांडे, राहूल दराडे, मसूद जिलानी आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.