वावी : सिन्नर- शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी दुपारी मात्र एक शिवशाही बस अपघातग्रस्त होण्यापासून सुदैवाने बचावली. या धावत्या बसच्या टायरचे रिमोल्ड कव्हर चक्क गळून पडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील वावी येथील टोल नाक्याजवळ घडली. (Nashik Shivshahi bus tire remold cover falls off Shirdi route)
नाशिकहून शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण करणारी शिवशाही बस टोलनाक्यापासून काही अंतर मागे असताना अचानक काहीशी अनियंत्रित झाली. कदाचित टायर पंचर झाले असावे असे समजून चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. चालक आणि वाहक बसच्या सर्व चाके तपासात होते.
मात्र त्यांना टायर पंचर झाले नसल्याचे आढळून आले. तरी देखील बसने हेलकावे का घेतले असा विचार त्या दोघांचा सुरू होता. त्याच दरम्यान हा सर्व प्रकार बघणाऱ्या काही स्थानिकांनी बसच्या टायरचे रिमोल्ड कव्हर सुमारे अर्धा किलोमीटर पाठीमागे गळून पडल्याचे निदर्शनास आणून दिले. (latest marathi news)
ते समजल्यावर दोघेजण धावत पळत आले आणि रीमोल्ड कव्हरचा तुकडा ताब्यात घेतला. आम्हाला हा तुकडा आगारात जमा करावा लागेल असे त्यांनी सांगितले. हा प्रकार घडला तेव्हा बसचा वेग कमी असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार सुदैवाने घडला नाही. मात्र बस वेगात असती तर मात्र अपघातांच्या मालिकेत भर पडली असती हे मात्र नक्की.
बस आगारातून निघताना तांत्रिकदृष्ट्या सर्व तपासण्या केल्या जातात. त्यात टायरची अवस्था देखील तपासली जाते हवेचा दाब बघितला जातो असे असताना सदर बसच्या टायरचे रीमोल्ड कव्हर एवढे धोकादायक परिस्थितीत असेल ही बाब लक्षात आली नाही का हा प्रश्न उपस्थित होतो. पावसाळ्याच्या दिवसात एसटी बसच्या तांत्रिक तपासण्या काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. याकडे एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.