चांदोरी : ढोलताशे आणि तुतारीच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वावरून आगमन, सोबत महाराजांचे अष्टप्रधान महामंडळ... स्वराज्याच्या स्थापनेपासून तर शिवराज्याभिषेकापर्यंतचा सोहळा या दरम्यान रोमांचकारी अफजलखानाचा वध ते डोळ्यात पाणी आणणारा शूरवीर तानाजी मालुसरेंचे बलिदान.. सोबतीला गगनभेदी घोषणा.... शिवरायांचा जयजयकार या सर्वाना साक्षीदार होते. हजारो चांदोरीकर नागरिक... (Shivshahi incarnated in Chandori)
नवरात्रीनिमित्त राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख, सरपंच संदीप टर्ले व मोनिका संदीप टर्ले यांनी आयोजित केलेल्या ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या महानाट्याचा प्रयोग रविवारी (ता.६) रात्री झाला. या महानाट्याला लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
ओझर येथील स्थानिक कलाकार शाम विसपुते यांनी दिग्दर्शन केलेले स्थानिक सुमारे सत्तर कलाकारांचे ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या महानाट्याचा प्रयोग झाला. या महानाट्यातील पात्रे सर्वच ओझर येथील स्थानिक कलाकार होते. या कलाकारांनी एखाद्या कसलेल्या अभिनेत्यांसारखा अभिनय करत उपस्थितांची दाद मिळवली. महानाट्यातील अफजलखानाचा वध हा उपस्थित रसिकांच्या अंगावर रोमांच आणणारा होता. शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा प्रसंग हा उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. (latest marathi news)
छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या श्रीकांत कदम यांचा अश्वावरून झालेला प्रवेश तसेच संवादफेक एखाद्या कसलेल्या लाजवेल अशीच होती. या महानाट्याला महिला वर्गाची सर्वाधिक होती. तब्बल अडीच तास खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या महानाट्यास खासदार भास्कर भगरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार अनिल कदम, गोकूळ गिते, सरपंच विनायख खरात यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.