Abhijit Dani and Rahul Gaikwad etc while filming Marathi songs esakal
नाशिक

Nashik Shooting Destination: नाशिकमध्ये शंभरावर गाण्यांचे चित्रीकरण! स्थानिक कलाकारांना अच्छे दिन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Shooting Destination : मराठी चित्रपटांपेक्षा गाण्यांची लोकप्रियता जास्त असल्याने मुंबई व कोकणातील कोळी गीतांसह मराठी गाणी नाशिकमध्ये तयार होत आहेत.

वर्षभर ट्रेडिंग राहणाऱ्या शंभरावर गाण्यांची निर्मिती येथे होत असल्याने स्थानिक कलाकारांना अच्छे दिन बघायला मिळत आहेत. (Nashik Shooting Destination Shooting over 100 songs in Nashik Good income to local artists)

नाशिकची निसर्ग संपन्नता आणि चित्रीकरणासाठी पोषक वातावरणामुळे गाण्यांची निर्मिती होऊ लागली आहे. शहरात सद्यःस्थितीत दिग्दर्शक अभिजित दाणी यांचे अदा प्रॉडक्शन, रोहित जाधव आणि टीम, मनीष महाजन असे तीन प्रॉडक्शन हाऊस आहेत.

त्यांच्याकडून महिन्याला साधारणतः ९ ते १० गाणी तयार होतात. अदा प्रॉडक्शनने गेल्या वर्षभरात ‘हिल पोरी हिला, बावऱ्या मना, हार्ट ब्रेक झाला अशी १२ हीट गाणी बनवली आहेत. एका गाण्याच्या शूटिंगसाठी तीन दिवस लागत असले तरी शूटिंगचे ठिकाण शोधण्यात चार ते पाच दिवस जातात.

असे साधारणतः एक ते दोन आठवड्यात गाण्याची निर्मिती होते. ‘पिरतिचे याड’ हे शिवरायांच्या जीवनावर आधारित गाणे शूटिंग करताना गडकिल्ल्यांचा स्टेज उभारला. त्याला दिलेले इफेक्ट आणि संगीतामुळे हे गाणे आतापर्यंत तब्बल दीड कोटी प्रेक्षकांनी बघितले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच जबराट, दिल झन्नाट, झुमका, पिरमाची लागन यासारख्या गाण्यांना यू- ट्यूबवर काही लाखांवर बघितले गेले आहे. नाशिकमध्ये शूटिंग केलेली गाणी हीट झाल्यामुळे कोकण व मुंबईतील बहुतांश गाण्याचा ओघ आता नाशिककडे सुरू झाल्याने कलाकारांना चांगले काम करण्याची संधी मिळत आहे.

अदा प्रॉडक्शनच्या टीममध्ये अभिजित दाणी यांच्यासोबत साहिल पाटील, राहुल गायकवाड, आदित्य पवार, दिनेश शिरसाट, अभिषेक क्षत्रिय, प्रियांका दाणी, प्रसन्न पोतदार, रूपेश शिरोदे, योगेश भोये, वासू चव्हाण, मोहन बोरसे, आकाश अरगडे आदी काम करतात.

"गाणे तयार करताना त्याला स्टोरीची जोड दिल्यामुळे नाशिकचे नवीन नाव तयार झाले. या गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतल्यामुळे कोकण व मुंबईतील बहुतेक गाणे आता नाशिकलाच मिळत आहेत. येथील कलाकारांनाही यातून संधी मिळते."

- अभिजित दाणी, दिग्दर्शक

"या गाण्यांच्या माध्यमातून नाशिकचे नाव आत मुंबईतही गाजत आहे. शूटिंगसाठी आपल्याकडे योग्य वातावरण असल्याने त्याचा फायदा होतो."- राहुल गायकवाड, आर्ट डिरेक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT