सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील राजरत्ननगर येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने रहिवाशांचे विद्युत उपकरणे अचानक बंद पडले. यामुळे लाखांचे नुकसान झाल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. मर्चंट बँकेच्या पाठीमागील परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. बुधवारी (ता. २) रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठा जाळ निघाला.
या वेळी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक रहिवाशांच्या घरातील विद्युत उपकरणात मोठा आवाज होऊन धूर निघू लागला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेकांनी प्रकार घडल्यानंतर घरातून बाहेर पळ काढला. टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर, विजेची मोटर, फॅन, एलईडी लाइट यासह विविध विद्युत उपकरणे बंद पडली होती. महावितरण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी रहिवासी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्थानिक रहिवाशांनी स्पष्ट केले आहे.
"सिडको परिसर हा कामगार लोकांची वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे राहणारे रहिवासी आपल्या पोटाला चिमटा देऊन देऊन गृहोपयोगी वस्तू विकत घेत असतात. अशात त्यांचे झालेलं नुकसान मोठे असून महावितरण विभागाने भरपाई न दिल्यास आंदोलन उभारणार आहे."
- प्रशांत जाधव, महानगरप्रमुख, आरपीआय (आठवले गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.