Shrikrishna Deshpande while guiding the seminar. Neighbors Sushma Misal, Rahul Sonwane etc. esakal
नाशिक

Nashik News : पर्यटनस्थळ सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र यावे : श्रीकृष्ण देशपांडे

Nashik News : नाशिक भटकंती कट्टातर्फे जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे शनिवारी (ता. ६) पावसाळी पर्यटन आणि सुरक्षितता चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कोरोनानंतर पर्यटनस्थळी रिल्स बनविण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांची संपूर्ण भौगोलिक माहिती नसताना देखील याठिकाणी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातून आता याठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पावसाळ्यात पर्यटनामध्ये धोकादायक ठिकाणी जोखीम वाढते. (Shrikrishna Deshpande statement Everyone should come together for safety of tourist places)

त्यामुळे हे पर्यटन बंदच करण्यात यावे, असाही सूर येतो. परंतु, पर्यटन थेट बंद करण्याऐवजी ते पूर्ण: सुरक्षित कसे करता येईल, यासाठी संबंधित सर्व घटकांनी मोट बांधायला हवी, असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केले. नाशिक भटकंती कट्टातर्फे जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे शनिवारी (ता. ६) पावसाळी पर्यटन आणि सुरक्षितता चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी साहसी गिर्यारोहक सुषमा मिसाळ, गिर्यारोहक राहुल सोनवणे, संजय खत्री, दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे, मविप्रचे प्रा. हेमंत पाटील, निसर्ग अभ्यासक वसुधा विश्वास पाटील, प्रशिक्षित बचाव दल गौरव जाधव आदी उपस्थित होते. श्री. देशपांडे पुढे म्हणाले, की सुरक्षितता ही प्रशासनासोबतच सामाजिक जबाबदारी आहे.

त्यादृष्टीने प्रशासनाने गेल्यावर्षी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ५०० ‘आपदा’ मित्र तयार केले. या सर्वांना नाशिक पोलिस अकादमीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. आपदा मित्रांचा विमा काढण्यात आला आहे. त्यांना सेफ्टी किट देण्यात आले आहे. एनडीआरएफतर्फे आपत्तीत मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (latest marathi news)

पर्यटन असो की ट्रेकींगला जाताना आपणे नेमके कोणासोबत जात आहोत हे महत्त्वाचे असते. आजकाल सरार्सपणे ग्रुप पर्यटनाला जातात. यात पर्यटनस्थळाबाबत कोणालाही फारसे ज्ञान नसते. परिणामी अपघात होतात. त्यासाठी ग्रुपने अन्‌ अनुभवी लोकांसमवेत पर्यटनस्थळी जावे असे राहूल सोनवणे यांनी सांगितले.

ट्रेकला जाताना नेमका कसा पेहराव, बुट, सोबत काय असले पाहिजे याबाबत कुलथे यांनी मार्गदर्शन केले. पावसाळी पर्यटन दरम्यान शासन, मिडीया, पोलिस यांनी समन्वय ठेवला पाहिजे. मद्यपान करून पर्यटनस्थळी, ट्रेकींगला जाणे टाळावे असे वसुधा पाटील यांनी सांगितले. हवामानाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार निर्णय संकटकाळात घेण्याची गरज असते.

त्यासाठी हवामानाचा अभ्यास असणारे ग्रुपमध्ये असणे महत्त्वाचे असते असे सुषमा मिसाळ यांनी सांगितले. पूर्वी पर्यटन अथवा ट्रेकींगला एक अनुभव व आनंद घेण्यासाठी जात असे. परंतु हल्ली मज्जा, म्हणून लोढेंच्यालोढें बाहेर पडत आहे यातून अपघात वाढत असल्याचे मत खत्री यांनी व्यक्त केले.

त्यासाठी पर्यटन स्थळ, ट्रेकींग पॉंईंट यांची माहिती असलेले स्वतंत्र संकेतस्थळ तयार करत, यावर सर्व भौगोलिक, ऐतिहासिक, माहिती द्यावी. जेणेकरून स्थळी जातांना त्याचा उपयोग होईल असेही त्यांनी यावेळी सूचना मांडली. गौरव जाधव यांनी आपले अनुभव सांगितले. सूत्रसंचालन प्रशांत परदेशी यांनी केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT